शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

... आणि पुणेकरांनी ' असे ' केले मराठी नववर्षाचे स्वागत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 12:59 IST

रस्त्यावर शुकशुकाट, घरात आनंदाचे वातावरण 

ठळक मुद्देलॉकडाऊन झाल्याचे कळले, पुणेकरांची धडधड वाढली जीवनावश्यक वस्तूंची खरेदी कुठं आणि केव्हा करावी हे कळेना 

पुणे : वसंत ऋतू आगमन, झाडांची फुटणारी नव पालवी यांसह रांगोळी, तोरणे आणि घरोघरी गुढी उभारुन दरवर्षी केली मराठी नववर्षाची सुरुवात होेते. मराठमोळ्या वर्षातला पहिलाच सण म्हणून याची गणना होते. यावर्षी या सणावर कोरोनाचे सावट आहे. तसेच मात्र कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात काल रात्री पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र, असे असतानाही पुणेकरांनी पाडव्याकरिता ज्या वस्तू बाजारात उपलब्ध होत्या त्या खरेदी करून घरोघरी गुढी उभारुन किंवा मग रांगोळीत गुढीचे चित्र काढून नववर्षाचे आनंदाच्या उत्साहात स्वागत केले. तसेच जगावर आलेले कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर होण्यासाठी प्रार्थना देखील केली. सकाळी सकाळी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात पहिल्या सापडलेल्या पुण्यातील कोरोना रुग्णाला आज डिस्चार्ज मिळाला ही   आनंदाची बातमी आली.त्याने पुणेकरांच्या मनाला दिलासा मिळाला तसेच सर्वत्र आनंदाचे वातावरण तयार झाले. कारण गेली कित्येक दिवस आरोग्य विभाग, प्रशासन, डॉक्टर, कोरोनाबाधित रुग्ण, नर्स , वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले होते. या घटनेमुळे सर्वसामान्यांच्या मनात कोरोनाबद्दल निर्माण झालेली भीती  होण्यासाठी आणि जे या विळख्यात सापडलेले आहे त्यांचे मनोबल  वाढण्यास नक्कीच मदत होईल.

शहरभरात कोरोनाचे सावट असताना देखील घरच्यांसमवेत गुढीपाडवा साजरा करता आल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे दिसून आले. सर्वत्र शुकशुकाट असून देखील घरोघरी उभारण्यात आलेल्या गुढीने पुणेकरांच्या मनाला दिलासा दिला.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण देशात लॉकडाऊन झाल्याचे कळताच पुणेकरांनी बाजारात गर्दी केल्याचे दिसून आले. एकीकडे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आणि दुसरीकडे बंद असलेल्या बाजारपेठा यात खरेदी कशी करावी या संभ्रमावस्थेत नागरिक असल्याचे दृश्य बुधवारी पाहावयास मिळाले. कुणीही गर्दी करू नये यासाठी पोलिसांची सारखी गस्त सुरू असल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी जाताना नागरिकांच्या मनात अद्याप भीतीचे सावट आहे. मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून यापुढील 21 दिवस देशात लॉकडाऊन असल्याचे घोषित केले. त्यानंतर थोड्याच वेळाने रात्रीच्या वेळी बाजारात किराणा माल घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. जिल्हाधिकारी प्रशासन यांनी नागरिकांना सकाळच्या वेळेत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी साठी बाहेर पडता येईल असे सांगितल्या नंतरही पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी नागरिकांना प्रयत्न करावे लागले. शनिवार पेठ, नारायण पेठ, रविवार पेठ याठिकाणी दुचाकीवरून नागरिक खरेदीसाठी यायला लागल्या नंतर पोलिसांनी त्यांना हटकण्यास सुरुवात केली. तसेच अनेक वाहनचालकांना दरडावून पुन्हा पाठवले. यामुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Puneपुणेgudhi padwaगुढीपाडवाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNarendra Modiनरेंद्र मोदी