शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

प्राचीन बुद्ध लेण्या घालतायेत पर्यटकांना भुरळ...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 03:04 IST

निसर्ग पर्यटनासाठी सर्वाधिक पसंती, ठेवा जपण्याचे आवाहन

खोडद : जुन्नर तालुक्यात असणारी नैसर्गिक विविधता आणि नैसर्गिक सौंदयार्ने नटलेल्या बुद्ध लेण्या वर्षा सहलींसाठी पर्यटकांना व अभ्यासकांना साद घालत आहेत.वाढलेल्या गवतातून पायवाटेने मार्ग काढत, अंगावर श्रावण सरी झेलत, अलगत येऊन अंगाला झोंबणारा वारा, बुद्धलेण्यांवर डोंगर कड्यांमधून निथळत येणारे पावसाचे पाणी,सतत पडणा-या पावसाच्या पाण्यामुळे लेण्यांच्या खडकाला ठिकठिकाणी फुटलेले पाझर सध्याच्या पावसाळ्यातील अशा या मनमोहक आणि प्रसन्न वातावरणामुळे अधिकच विलोभनीय दिसणा-या आणि तथागत बुद्धांच्या तत्वज्ञानाची व विचारांची साक्ष देत शेवटच्या घटका मोजत का होईना उभ्या असलेल्या जुन्नर तालुक्यातील या बुद्धलेण्या पर्यटकांना व अभ्यासकांना जणू आपल्या लावण्याची भुरळ घालत पर्यटनासाठी साद घालत आहेत.या बुद्ध लेण्यांमध्ये प्रवेश केल्यानंतर वषार्वास अनुभवल्याची प्रचीती येते. जुन्नर तालुक्यात सुमारे ३५० ते ४०० लेण्या आहेत. तालुक्यात सर्र्वात पहिली खोदलेली लेणी तुळजा लेणी आहे. लेण्याद्री येथे २९ लेण्या तर किल्ले शिवनेरीवर ६५ लेण्या आहेत. तालुक्यात लेण्यांचे ९ गट असून २५ लेणी अपूर्णावस्थेत आहेत. पाण्याची एकूण ११५ कुंड आहेत. ३६ शिलालेख प्राकृत लिपित आढळतात. माळशेजघाट, नारायणगड, हरिश्चंद्रगड, खिरेश्वर,नाणेघाट, किल्ले जीवधन, किल्ले चावंड, किल्ले हडसर, किल्ले शिवनेरी, तुळजालेणी, हटकेश्वर, कुकडेश्वर, मानमोडी, भागडीचा डोंगर आदी भागात लेण्या आढळतात.जुन्नर तालुक्यातील दोन हजार वर्षापूर्वी सातवाहन काळातील लेण्याद्री लेणीच्या जवळ असलेल्या सुलेमान बुद्ध लेणी च्या चैत्यप्रवेश द्वारावर धम्मचक्र कोरलेले पहायला मिळते. आज या लेणी कोरून दोन हजार वर्षांचा काळ लोटला गेला असला तरी ते नक्षीकाम आजही खुप सुंदर दिसते. पिंपळाच्या पानाच्या मधोमध कोरलेले धम्मचक्र मनमोहुन टाकते व दोन हजार वर्षां पुवीर्चे ते कारागीर किती उत्तम प्रकारचे असतील हे प्रचिती या लेणी पाहुन होते. सुलेमान लेणी मध्ये एक चैत्य गृह असुन, चैत्य प्रवेशद्वार खुप सुंदर नक्षी काम करून सजवलेले आहे.

टॅग्स :Buddha Cavesबौद्ध लेणीPuneपुणे