पुणे- भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी आनंद तेलतुंबडे यांना आज सकाळी पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पुण्यातील सत्र न्यायालयानं काल त्यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला होता. त्यानंतर आज सकाळी पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली. मुंबई विमानतळावर उतरताच पुणे पोलिसांकडून तेलतुंबडेंना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तसेच पुणे पोलीस तेलतुंबडेंना पुण्याला घेऊन गेले असून, आज न्यायालयात हजर करून त्यांच्या कोठडीची मागणी करणार आहेत. पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांच्यावर नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी कारवाई केली होती. मात्र 'मी कोणत्याही बेकायदा कार्यवाहीत सहभागी झालेली नाही आणि कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराशी माझा काहीही संबंध नाही', असा दावा करत आनंद तेलतुंबडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत त्यांच्यावरील एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती.
भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात आनंद तेलतुंबडे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 11:36 IST
भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी आनंद तेलतुंबडे यांना आज सकाळी पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात आनंद तेलतुंबडे अटकेत
ठळक मुद्देभीमा-कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी आनंद तेलतुंबडे यांना अटकपुणे पोलिसांनी आज सकाळी तेलतुंबडेंना केली अटकपुण्यातील सत्र न्यायालयानं काल त्यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला होता.