शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

वडापाव देण्याच्या बहाणा! १९ वर्षीय तरुणीवर घरी नेत पत्नीच्या मदतीने पतीने केला अत्याचार

By नितीश गोवंडे | Updated: April 6, 2024 16:17 IST

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी संबंधित दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे...

पुणे : ओळखीच्या असलेल्या महिलेने एका १९ वर्षीय मुलीला वडापाव खायला देण्याच्या बहाण्याने घरी नेले. तरुणीला घरात सोडून महिला बाहेरून दाराची कडी लावून निघून गेली. यावेळी घरातच असलेल्या महिलेच्या पतीने तरुणीवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. हा प्रकार बुधवारी (दि. ३) दुपारी दोन ते रात्री साडेअकराच्या सुमारास कात्रज परिसरात घडला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी संबंधित दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पीडित १९ वर्षीय मुलीने शुक्रवारी (दि. ५) भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून प्रल्हाद सखाराम साळुंके (४८, रा. कात्रज) व त्याच्या पत्नीवर (४५) बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास भाजी मंडई येथे पायी चालत जात होती. त्यावेळी तिच्या ओळखीची आरोपी महिला भेटली. महिलेने तरुणीला गोड बोलून तिच्या राहत्या घरी घेऊन गेली. तरुणीला वडापाव देण्याचा बहाणा करुन तिला एकटीला घरात ठेवून बाहेर निघून गेली. महिलेने घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली. तरुणी घरात एकटी असल्याचे पाहून महिलेच्या पतीने तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करुन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. पतीच्या या कृत्याला त्याच्या पत्नीने मदत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रियंका निकम करत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMolestationविनयभंग