शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

निर्दयी! पत्नीसोबतच्या भांडणात ८ वर्षांची मुलगी आली; नशेत पित्याने तिच्यावरच गोळी झाडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 19:10 IST

मुलीचा जीव वाचविण्यासाठी पोलिसांची धडपड......

धायरी (पुणे) : नवरा - बायकोच्या भांडणात स्वतःच्या आठ वर्षीय मुलीला गोळी लागल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. राजनंदिनी पांडुरंग उभे असे गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पांडुरंग तुकाराम उभे (वय :३८ वर्षे, रा. हेरंब हाईट्स, नऱ्हे, पुणे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग उभे हे कुटुंबासह नऱ्हे येथील जेएसपीएम कॉलेज जवळ असणाऱ्या परिसरात राहतात. त्यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. तसेच त्यांच्याकडे परवाना असलेले रिवाल्वर आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ते दारू पिऊन घरी आले. त्यामुळे दोघा नवरा - बायकोमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात त्यांनी बायकोवर रिवाल्वर उगारली मात्र ती गोळी त्यांच्या आठ वर्षीय मुलीला छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली. यामध्ये ती गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. 

मुलीचा जीव वाचविण्यासाठी पोलिसांची धडपड...गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पांडुरंग उभे यांना ताब्यात घेतले. तसेच ज्या खासगी रुग्णालयात जखमी राजनंदिनीवर उपचार चालू आहेत. त्या ठिकाणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांनी जाऊन जखमी राजनंदिनी चौकशी केली. आता तिची प्रकृती स्थिर असल्याचे सिंहगड रस्ता पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस