शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Baramati: फुकट अंडी न दिल्याने अंडा भुर्जी विक्रेत्याचा केला खून, बारामतीमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 09:36 IST

पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली...

बारामती (पुणे) : फुकट अंडी न दिल्याच्या कारणावरून अंडा भुर्जी विक्रेत्याचा मारहाण करून खून केल्याचा प्रकार घडला होता. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी शहरातील टि सी कॉलेज रस्त्यावर अंडा भुर्जी विक्री करणारा शाहबाज रौफ पठाण (वय ३२ वर्षे रा. सद्गुरु नगर पाटस रोड ता. बारामती) हा रात्रीच्या वेळी अंडा भुर्जी गाडी लावून विक्री करीत होता. त्याला अज्ञात कारणावरून अज्ञात इसमाने गंभीर जखमी केले होते. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी  गुन्हा दाखल करणेत आला होता. जखमीवर  खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना रविवारी ( ८ ऑक्टोबर )त्याचा म्रुत्यु झाला होता. 

पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी गुन्हा दाखल झाल्या नंतर यातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी ४ पोलीस पथक तयार केले होते. गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस अंमलदार दशरथ इंगोले व अक्षय सिताप यांनी तांत्रिक विश्लेषण तसेच गुन्हा घडले ठिकाणी आजूबाजूला असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यावेळी शहाबाज पठाण यास दारूचे नशेत फुकट अंडी देण्याबाबत एकाने वाद घातल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे माहिती काढून प्रवीण भानुदास मोरे (वय ३६ रा. कल्याणी नगर तांदुळवाडी ता. बारामती)  याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली. यावेळी  त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने बारामती शहर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

व्यावसायिक तसेच इतर लोकांना विनाकारण त्रास देणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांबाबत माहिती असल्यास, तत्काळ बारामती शहर पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा. किंवा ११२ या आपत्कालीन नंबरवर माहिती द्यावी ,असे आवाहन पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीBaramatiबारामती