शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

आत्या असल्याचे सांगून पुण्यात शाळेतून ५ वर्षीय मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 13:30 IST

त्याचवेळी मुलीचे वडील शाळेत आल्यामुळे अनर्थ टळला...

- नम्रता फडणीस

पुणे : पाच वर्षाच्या मुलीच्या शाळेतील शिक्षकांना आपण तिची आत्या असल्याचे सांगत मुलीला पळवून नेण्याचा प्रकार घडला. सुदैवाने मुलीचे वडील शाळेत आले होते आणि त्यांनी मुलीला घेऊन जात असताना महिलेला अडविले. तेव्हा त्यांनाच आपण तिची आत्या असल्याचे महिलेने सांगितल्यामुळे तिचा बनाव समोर आला. खडकी पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. खडकी येथील एका शाळेत ही घटना घडली.

छाया युवराज शिरसाठ (वय २८, रा. अकोला) असे या महिलेचे नाव आहे. हा प्रकार खडकीतील एका शाळेत मंगळवारी सकाळी ११ वाजता घडला. याबाबत खडकीतील एका ३५ वर्षाच्या नागरिकाने फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही मुळची अकोला येथील राहणारी असून ती मानसिक समस्येने ग्रस्त आहे. ती सोमवारी पुण्यात आली होती. खडकीतील एका सोसायटीमधील एका घराची तिने मध्यरात्री बेल वाजून त्यांना तुमच्याकडे काम असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी इतक्या रात्री आल्याने शंका घेऊन सुरक्षारक्षकाला बोलावून तिला बाहेर काढले होते. त्यानंतर ती खडकीतील शाळेत गेली.

फिर्यादी यांची ५ वर्षाची मुलगी खासगी शाळेत शिकते. शाळा सुटल्यावर तिला आणण्यासाठी ते शाळेत गेले होते. तेव्हा या महिलेने शाळेतील शिक्षकांना व तेथील उपस्थित पालकांना आपण मुलीची आत्या आहे, असे सांगून मुलीच्या हाताला धरुन तिला घेऊन ती जाऊ लागली होती. सुदैवाने  फिर्यादी हे वेळेवर पोहचले. त्यांनी हा सर्व प्रकार पाहून त्यांनी या महिलेकडून मुलीला ताब्यात घेतले़. या महिलेला पोलिसांच्या हवाली केले. सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेKidnappingअपहरणpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीKhadkiखडकी