शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Breaking | अमरावतीमधील लव जिहाद प्रकरणातील तरुणी सापडली, लोहमार्ग पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 07:46 IST

या तरुणीचा पत्ता लागला असून ही तरुणी पुणे लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात आहे....

- किरण शिंदे

पुणे:अमरावतीत एका मुलीला पळवून नेऊन आंतरधर्मीय विवाह केल्याचा प्रकरण समोर आल्यानंतर वातावरण चांगलं तापलं होतं. हिंदू तरुणीचे अपहरण करून तिचा आंतरधर्मीय विवाह केला. त्यानंतर या मुलीला डांबून ठेवल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला होता. खासदार नवनीत राणा यांनी या बेपत्ता मुलीवरून पोलीस ठाण्यात जोरदार राडा केला होता. दरम्यान या तरुणीचा पत्ता लागला असून ही तरुणी पुणे लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात आहे. 

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावती पोलीस ठाण्यात ही तरुणी मिसिंग असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या मुलीचे लोकेशन पुणे लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत असल्याने तिचा शोध व्हावा अशी विनंती लोहमार्ग पोलिसांना करण्यात आली होती. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी या मुलीचा फोटो पाठवून शोध सुरू केला. 

दरम्यान ही मुलगी निजामुद्दीन ते वास्को-द-गामा गोवा एक्सप्रेसने गोव्याच्या दिशेने प्रवास करत असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली होती.  ही ट्रेन सातारा या ठिकाणी असल्याने पोलिसांनी स्टेशन मास्तर यांना फोन करून गाडी स्टेशनवरच थांबवावी अशी विनंती केली. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास या मुलीला ताब्यात घेतले. 

लोहमार्ग पोलिसांनी यावेळी रेल्वेच्या 22 डब्यांची तपासणी केली. त्यातील एस 6 एस 7 या डब्यामध्ये ही मुलगी एकटी प्रवास करताना आढळून आली आहे. पोलीस अधिकारी मेनकर व पाटील यांच्या पथकाने या मुलीला सुरक्षित ताब्यात घेतले असून सध्या ती सातारा लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात आहे.

टॅग्स :PuneपुणेAmravatiअमरावतीnavneet kaur ranaनवनीत कौर राणाLove Jihadलव्ह जिहादrailwayरेल्वेPoliceपोलिस