शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अमोल मिटकरींना 'ते' विधान चांगलंच भोवण्याची शक्यता? पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 17:20 IST

ब्राह्मण समाज आणि हिंदू धर्मामधील ‘कन्यादान’ या पवित्र लग्नविधीबाबत विधान करणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना चांगलेच भोवण्याची शक्यता आहे

पुणे : ब्राह्मण समाज आणि हिंदू धर्मामधील ‘कन्यादान’ या पवित्र लग्नविधीबाबत विधान करणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना चांगलेच भोवण्याची शक्यता आहे. त्यांच्या विधानामुळे हिंदू धर्मियांसह ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असून, सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मिटकरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा आणि योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार भारतीयजनता युवा मंचचे उपाध्यक्ष कुणाल टिळक यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेला इस्लामपूरमध्ये सुरूवात झाली. त्यावेळी झालेल्या सभेत अमोल मिटकरी यांनी 'आम्हा बहुजनाच्या पोरांना काही समजू देत नाही, पण एका लग्नात गेलो होतो तिथे नवरदेव पीएचडी आणि नवरी एमए झालेली होती.त्यावेळी ब्राह्मणाने ’’ मम भार्या समर्पयामी’ असा एक मंत्र म्हटला. मी नवरदेवाच्या कानात त्याचा अर्थ सांगितला, अरे येड्या ते महाराज म्हणतायत ‘मम म्हणजे माझी. भार्या म्हणजे माझी बायको आणि समर्पयामी म्हणजे घेऊन जा..आरारारा कधी सुधारणार? अशा प्रकारचे आक्षेपार्ह विधान ब्राह्मण समाजाबाबत केले होते. सध्या याच त्यांच्या विधानावरून राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे.

ब्राह्मण महासंघानेही मिटकरी यांच्या विधानाचा निषेध करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसविरोधात आंदोलन केले होते. मिटकरी यांनी ब्राम्हण समाजाची बदनामी केली असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. त्यात आता भारतीय जनता युवा मंचचे उपाध्यक्ष कुणाल टिळक यांनी मिटकरी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. मिटकरी यांच्या या विधानामुळे हिंदू धर्मातील बांधवांच्या व खास करून ब्राहमण समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. ब्राहमण समाजातील मोठा घटक हा पौराहित्य वर आपली उपजीविका चालवतो. हे विधान मिटकरी यांनी मुददाम केले असून, ब्राह्मण समाजाची खिल्ली उडविण्यात आली आहे. ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Amol Mitkariअमोल मिटकरीbrahman mahasanghब्राह्मण महासंघSocialसामाजिकNCPराष्ट्रवादी काँग्रेस