शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

भाजपाच्या पन्नाप्रमुखांना अमित शाह देणार विजयाचा ‘कानमंत्र’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 15:02 IST

पन्नाप्रमुख ही भाजपाची संघटना पातळीवरील खास गोष्ट आहे.

ठळक मुद्देयुक्तीच्या चार गोष्टी : पुणे, बारामतीसह शिरूरलाही निमंत्रण मतदार यादीतील १ हजार मतदार या अर्थाने  हजारीपन्ना प्रमुख अशी ही संकल्पना

- राजू इनामदार-  पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी संघटनात्मक पातळीवर भारतीय जनता पाटीर्ने जय्यत तयारी सुरू केली आहे. शिवसेनेकडे असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघासह पुणे व बारामती मधील पन्नाप्रमुखांबरोबर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ९ फेब्रुवारीला स्वत: संवाद साधून विजयचा कानमंत्र देणार आहेत. पन्नाप्रमुख ही भाजपाची संघटना पातळीवरील खास गोष्ट आहे. त्याचा संदर्भ थेट मतदारयादीशी आहे. ही रचनाही शहा यांनी पुर्वीच्या रचनेत काही बदल करून स्वत: केली आहे. मतदार यादीतील १ हजार मतदार या अर्थाने  हजारीपन्ना प्रमुख अशी ही संकल्पना आहे. या १ हजार मतदारांच्या नावांची मतदार यादीत साधारण २५ पाने होतात. या प्रत्येक पानाला प्रमुख आहे. हजारी पन्नाप्रमुख हा त्यांचा प्रमुख. त्याला बूथ प्रमुख असेही म्हणतात. अशा ५ ते ६ हजारी पन्नाप्रमुखांचा एक शक्तीकेंद्र प्रमुख.या हजारी पन्नाप्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुखांची एक महाबैठक ९ फेब्रुवारीला गणेश कला क्रिडा मंदिरात आयोजित करण्यात आली आहे. पन्नाप्रमुख, हजारी पन्ना प्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुख यांनी काय कामे करायची, कशी करायची हे त्यांना नेमून दिलेले आहे. म्हणजे २५ मतदारांची जबाबदारी असलेल्या पन्नाप्रमुखाने या २५ मतदारांच्या थेट घरांच्या संपर्कात रहायचे. कुटुंबातील मतदार असलेल्या सदस्यांबरोबर संवाद साधत रहायचे. त्याला भाजपाची ध्येयधोरणे समजावून सांगायची. भाजपाला मतदार करणे त्यांच्या, देशाच्या समाजाच्या कसे हिताचे आहे ते सांगणे, त्यांच्या मनावर ठसवणे हे काम त्यांनी करायचे आहे. शक्तीकेंद्र प्रमुखाने त्याच्या अखत्यारीत असलेल्या बूथप्रमुख म्हणजे हजारी पन्नाप्रमुखाच्या कामावर लक्ष ठेवायचे आहे. हजारी पन्नाप्रमुख त्यांच्या बूथ प्रमुखाच्या कामावर लक्ष ठेवतील. शक्तीकेंद्र प्रमुखाने हजारी पन्नाप्रमुखाच्या कामाचा सातत्याने आढावा घ्यायचा आहे. तो तोंडी असेल लेखी असेल, पण त्याने काम केले आहे किंवा नाही, त्याच्या कार्यक्षेत्रातील मतदार कुटुंबांबरोबर त्याचा संपर्क झाला आहे किंवा नाही याची चाचणीही त्याने घ्यायची आहे. या सर्वांनी मिळून त्यांच्या संपर्कात असलेल्या कुटुंबातील मतदार सदस्यांचे मतदानाच्या दिवशी सकाळी साधारण साडेअकरापर्यंत, म्हणजे पहिल्या टप्प्यातच मतदान घडवून आणायचे आहे.ही सर्व यंत्रणा कार्यरत झाली आहे. महापालिका निवडणूकीत शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी या यंत्रणेचा अत्यंत योग्य वापर केला. त्यामुळेच पक्षातच असलेल्या नगरसेवकांबरोबरच पक्षात बाहेरून ऐन निवडणूकीच्या तोंडावर आलेल्या उमेदवारांनाही नव्याने नगरसेवक होता आले. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच भाजपाने तब्बल ९८ नगरसेवक निवडून आले. आता पुन्हा एकदा ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यात असणाऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी तसेच त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत केलेले काम व यापुढे करायेच काम याची माहिती देण्यासाठी म्हणूनच राष्ट्रीय अध्यक्ष शहा येत आहेत. सकाळपासून ते सायंकाळपर्यंत हे शिबिर सुरू राहील. शिरूर व बारामतीमधील फक्त हजारी पन्नाप्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुख यांनाच बोलावले असून पुण्यातील मात्र बूथप्रमुखापासून हजारी पन्नाप्रमुख व शक्तीकेंद्रप्रमुख यांनाही उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. ------------------------शिरूर लोकसभा मतदार संघ गेल्या तीन टर्मपासून शिवसेनेकडे आहे. तरीही या लोकसभा मतदारसंघातील हजारी पन्नाप्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुखांना या महाबैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. 

टॅग्स :PuneपुणेAmit Shahअमित शहाBJPभाजपाPoliticsराजकारणElectionनिवडणूक