शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीस यांचेच नाव ‘मातोश्री’वर बैठकीत ठरले होते; अमित शहांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 05:07 IST

सत्ता सोडून पुन्हा निवडणुका लढण्याचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल आणि सत्ता आल्यास तेच मुख्यमंत्री होतील, असे माझ्या उपस्थितीत ‘माताेश्री’वर ठरले होते. तरीही शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाशी तडजोड केली. भाजपशी विश्वासघात केला आणि ज्यांच्याशी लढायचे, त्यांच्या मांडीवर जाऊन बसले, असा घणाघात केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी पुण्यात केला. असा खुलासा शहा यांनी दोन वर्षांनी केला आहे.  हिंमत असल्यास राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुका लढा, असे खुले आव्हानही त्यांनी शिवसेनेला दिले.

भारतीय जनता पक्षाच्यावतीने अमित शहा यांच्या उपस्थितीत रविवारी कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, मुक्ता टिळक, सुनील कांबळे, सरचिटणीस राजेश पांडे, माजी आमदार मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर आदी उपस्थित होते. 

२५ डिसेंबर रोजी होणाऱ्या ‘अटल शक्ती महासंपर्क अभियाना’ची घोषणा यावेळी करण्यात आली. ‘भारत माता की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणांनी अमित शहा यांनी भाषणाला सुरुवात केली. माझ्या कारकिर्दीची सुरुवात बुथ अध्यक्ष म्हणून झाली. बुथचा अध्यक्ष हा राष्ट्रीय अध्यक्ष होतो, हे केवळ भाजपमध्येच घडू शकते. पक्षात जो मागत नाही, त्याला न मागताच सगळे काही मिळते. हा नेत्यांचा नव्हे, कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आणि तेच पक्षाचे भविष्य आहे. कार्यकर्ता हा जनता आणि नेता यामधील दुवा असतो, असेही ते म्हणाले.

राज्य सरकारने पेट्रोलऐवजी दारू स्वस्त केली!

- महाआघाडी सरकार कायम महागाईच्या नावाने आरडाओरड करते. 

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल स्वस्त करा, असे सांगितले. मात्र, या सरकारने चुकीचे ऐकले आणि दारू स्वस्त केली. नागरिकांनी सरकारला प्रश्न विचारायला हवेत. सिद्धांतरहित राजकारण कोणालाही आवडत नाही. 

- राजकारणाचे अपराधीकरण आणि वसुलीचे शासन हेच शिवसेनेचे ध्येय आहे, अशी टीका शहा यांनी केली.

‘विजयाची मुहूर्तमेढ पुण्यातूनच व्हावी’

- आपल्याला विश्वासघाताचे परिमार्जन करायचे आहे. महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. जुने वैभव परत मिळवायचे आहे. 

- वैभव परत मिळविण्याची संधी पुणेकरांच्या हातात आहे. विजयाची मुहूर्तमेढ पुण्यातूनच व्हावी, अशी अपेक्षा शहा यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहUddhav Thackerayउद्धव ठाकरेPuneपुणे