शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

अमेरिकन कंपनीची गोपनीय माहिती फोडली :माजी अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 21:30 IST

अमेरिका येथील लोगान ब्रिटॉन इन्क या कंपनीची गोपनीय माहिती तिच्या ग्राहक कपंनीला पाठवून कंपनीचे १ लाख ८० हजार डॉलर (अंदाजे सव्वा कोटी) आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एका माजी अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़.

ठळक मुद्देमाजी अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा : सव्वा कोटी रुपयांचे नुकसानगोपनीय माहिती गैरहेतूने पुरवून कंपनीचे आर्थिक नुकसान करत विश्वासघात केल्याचे या फिर्यादीत नमूद

पुणे : अमेरिका येथील लोगान ब्रिटॉन इन्क या कंपनीची गोपनीय माहिती तिच्या ग्राहक कपंनीला पाठवून कंपनीचे १ लाख ८० हजार डॉलर (अंदाजे सव्वा कोटी) आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एका माजी अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. कपिल जयभगवान जैन (रा़. ब्रम्हा सनसिटी, वडगाव शेरी) असे या ग्राहकाचे नाव आहे. ब्रिटॉन इन्क या कंपनीच्या वतीने भारत भूषण चुघ (वय ५६, रा़ द्वारका, नवी दिल्ली) यांनी येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. चुघ हे दिल्लीतील अर्का ब्रिटॉन या कंपनीचे कार्यकारी संचालक आहेत़. जैन हे गुप्ता यांच्या लोगान ब्रिटॉन इन्कमध्ये सोल्युशन आर्किटेक्ट व प्रिन्सिपल कन्सलटंट म्हणून २०१२ पासून काम करीत होते़. त्यांना दिलेल्या लॅपटॉपमध्ये कंपनीची संवेदनशील व गोपनिय माहिती दिली होती़ . ३१ जानेवारी २०१८ रोजी जैन यांनी मी सुट्टीवर जात असून २२ फेब्रुवारीला पुन्हा रुजू होईल, असे सांगून भारतात आले़. मात्र, त्यांनी आपल्याकडील लॅपटॉप परत केला नाही़ रुजू न झाल्याने २६ फेब्रुवारी १८ रोजी कंपनीने त्यांना कामावरुन कमी केले़.  ही कंपनी डेटा सोल्युशन या क्षेत्रामध्ये सेवा पुरवठा करते़. त्यांच्या कामगारांना ताशी किती पगार देते याची माहिती ग्राहक कंपनीला नसते़. कपिल जैन यांनी भारतात आल्यावर लोगान ब्रिटॉन इन्क कंपनीचे कर्मचारी असल्याचे दर्शवून कंपनी कामगारांना देत असलेल्या पगाराची माहिती त्यांच्या सेवा पुरविणाऱ्या कंपनीला दिली़. त्यावरुन यु़ एस़ सेल्युलर कंपनीला लोगान ब्रिटॉन इन्क कंपनीने अधिक नफा कमविला आहे, हे लक्षात आले़. ते मान्य नसल्याने त्यांनी लोगान ब्रिटॉन इन्क कंपनीबरोबरचा करार स्थगित केला़. त्यामुळे या कंपनीला सेवा देणाऱ्या ९ कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली़. तसेच कंपनीला यु़ एस़ सेल्युलर बरोबरचा करार रद्द होऊ नये, म्हणून यु़ एस़ सेल्युलरला १ लाख ८० हजार ७२०़ ५४ डॉलर एवढी रक्कम परत करावी लागली़ .कंपनीची गोपनीय माहिती गैरहेतूने पुरवून कंपनीचे आर्थिक नुकसान करुन विश्वासघात केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे़. चुघ यांच्या फिर्यादीवरुन येरवडा पोलिसांनी कपिल जैन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे अधिक तपास करीत आहेत़. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिसAmericaअमेरिकाPuneपुणे