शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील आंबेगाव कचरा प्रकल्पाला संतप्त जमावाने लावली आग, अज्ञातांनी फोडले कार्यालय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 18:45 IST

Pune News : आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, दत्तनगर परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत असून आरोग्याला देखील धोका निर्माण झाला आहे

पुणे - आंबेगाव बुद्रुक येथील सर्वे नंबर ५१  मधील आरक्षित जागेवर कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला होता. या प्रकल्पामुळे आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, दत्तनगर परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत असून आरोग्याला देखील धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी या कचरा प्रकल्पाला आग लावली. तसेच काही अज्ञात व्यक्तींनी ऑफिसची तोडफोड केल्याची घटना रविवारी (दि.१) घडली आहे. 

आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द या परिसराचा गेली तीन वर्षापूर्वी महानगरपालिकेत समावेश झाला आहे. महापालिका समावेशनांत्तर कोणताही ठोस विकास निधी या भागासाठी मिळाला नाही. परंतु असे असतानाही कचरा प्रकल्प मात्र आंबेगावकरांचे माथी मारल्याने नागरिक तीव्र नाराजी असून रविवारी  या संदर्भात आंबेगाव येथील भैरवनाथ मंदिर येथे ग्रामस्थांच्या वतीने निषेध बैठकीचे आयोजन करण्यात आले. यात सर्व पक्षाचे नागरिक व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

यावेळी आंबेगाव चे फुरसुगी होऊ देणार नाही. मनपा प्रधासनाच्या जाहीर निषेध अशा घोषणा दिल्या. बैठकी नंतर संतप्त नागरिकांनी कचरा प्रक्रिया प्रकल्प येथे मोर्चा काढला तसेच  प्रकल्पासाठी जाणारा रस्ता जेसीबीच्या साहाय्याने खोदण्यात आला. तसेच या संतप्त नागरिकांपैकी काही अज्ञात युवकांनी प्रकल्पाला आग लावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तसेच या प्रकल्पाचे कार्यालय फोडण्यात आले असून मोठे नुकसान करण्यात आले आहे. यामध्ये टेबल, खुर्ची, टीव्ही यासारख्या साहित्याचे  मोठे नुकसान करण्यात आले आहे. या ठिकाणी कचऱ्याला आग लावल्याने धुराचे लोट परिसरात पाहायला मिळाले. आग विझवण्यासाठी कात्रज अग्निशामक दलाला बोलावण्यात आले. त्यांनी थोड्याच वेळात आगीवर नियंत्रण मिळवत आग विझवली. या संदर्भात भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर यांच्यासह वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मंगलदास माने उपस्थित होते. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेGarbage Disposal Issueकचरा प्रश्न