शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

Ambegaon Vidhan Sabha Election Result 2024 Live: आंबेगावात निसटता विजय; दिलीप वळसे पाटील अवघ्या पंधराशे मतांनी विजयी, देवदत्त निकम पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 16:36 IST

Ambegaon Assembly Election 2024 Result Live Updates आंबेगावात पहिल्या फेरीपासून अत्यंत चुरशीची लढत झाली असून शेवटच्या विसाव्या फेरीत अवघ्या १५०० मतांनी वळसे पाटील विजयी झाले

Ambegaon Vidhan Sabha Election Result 2024 Live : आंबेगाव विधानसभा मतदार संघाच्या अटीतटीच्या लढतीत सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा निसटता विजय मिळविला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांचा 1523 मतांनी पराभव केला आहे.

विधानसभेची ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असून पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत मताधिक्यात चढ-उतार होत होता. शेवटच्या विसाव्या फेरीत निकाल निश्चित होऊन सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील 1523 मतांनी विजयी झाले आहेत. एकूण 2 लाख 22 हजार 515 मतांपैकी वळसे पाटील यांना 1 लाख 6 हजार 888 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे देवदत्त निकम यांना 1 लाख 5 हजार 365 मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार देवदत्त निकम यांनी 2985 मते घेतली. मनसेचे उमेदवार सुनील इंदोरे यांना केवळ 1483 मते मिळाली आहेत. नोटाला 1157 मते मिळाली आहेत. मतमोजणी केंद्रामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. पोस्टल मतदानामध्ये व पहिल्या फेरीत निकम यांना आघाडी मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या फेरीत वळसे पाटील पुढे गेल्यानंतर चौथ्या फेरीत निकम यांना आघाडी मिळाली. पाचवी व सहावी फेरी वळसे पाटील यांच्या बाजूने गेल्यानंतर सातव्या फेरीत निकम यांनी पुन्हा आघाडी घेतली. त्यानंतर मात्र आठव्या, नवव्या, दहाव्या व अकराव्या फेरीत लगातार वळसे पाटील यांना आघाडी मिळवली.

 दहाव्या फेरीत त्यांचे मताधिक्य 3 हजार 700 होते.अकराव्या फेरीत ते 5 हजार 247 झाले. बाराव्या फेरीनंतर निकम यांनी वळसे पाटील यांची आघाडी कमी करण्यास सुरुवात केली. सातव्या फेरीत पाचशेच्या आत आघाडी आली. शेवटच्या 19 आणि 20 व्या फेरीत हे अंतर खूपच कमी झाले होते. मात्र बाभूळसर गावांमध्ये वळसे पाटील यांना निर्णायक मताधिक्य मिळाले व त्यांचा विजय साकार झाला. मतमोजणी केंद्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे हे एकत्र बसून मतांची बेरीज करत होते. तर दुसऱ्या बाजूला उमेदवार देवदत्त निकम हे सुद्धा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मतदान किती झाले याची माहिती घेत होते. शेजारी शेजारी बसलेल्या या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. मताधिक्य कमी अधिक होत असल्याने सर्वजण चिंतेत होते.  20 वी फेरी जेव्हा मोजून झाली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तर निकम यांनी निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांची भेट घेऊन फेरमतमोजणीची मागणी केली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024ambegaon-acआंबेगावDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार