शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

बळ दे झुंजायला! आंबेडकरी चळवळीतल्या एका बंडखोर निष्ठावंत कार्यकर्त्याची 'संघर्षगाथा'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 13:37 IST

आजही आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता उपेक्षितच...पत्नी कर्करोगाने ग्रस्त...उपचारासाठी पैसे नाहीत...घरात अन्नाचा कण नाही...

ठळक मुद्देआंबेडकरांचे अनुयायी म्हणवणाऱ्यांनी पुस्तके लिहून, गाणी गाऊन बाबासाहेबांच्या नावाने पैसे कमावले. समाजातील नामवंत आणि बुध्दीजीवी मंडळींनी पाच मुलांना जरी दत्तक घेतले असते प्रगती नक्कीच

नम्रता फडणीसपुणे :  पत्नी कर्करोगाने ग्रस्त...उपचारासाठी पैसे नाहीत...घरात अन्नाचा कण नाही...लॉक डाऊनमुळे घराबाहेर पडता येणे शक्य नाही.....ही बिकटपरिस्थिती आहे, आंबेडकरी चळवळीला ध्यासपर्व मानणाऱ्या एका बंडखोर निष्ठावंत कार्यकर्त्याची आंबेडकरी चळवळ म्हणजे एक आई आहे आणि तिच्या पदराला कितीतरी गाठी बांधलेले दारिद्रय आहे. पण त्या गाठींचे लुगडे सोडून तिला पैठणी नेसवल्याशिवाय चांगले दिवस येणार नाहीत, हा आशावाद त्यांच्या जगण्याला बळ देत आहे.संत कबीर, महात्मा फुले, नामदेव ढसाळ यांचे विचार हेच जगण्याचे अधिष्ठान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्वास असलेल्या या कार्यकर्त्याचे नाव आहे शरद गायकवाड. ते व्यवसायाने रांगोळीकार. पत्नी आणि आठ वर्षांचा मुलगा हा त्यांचा परिवार. शिक्षण फारसे घेता आले नसले तरी डॉ. आंबेडकर यांचे सर्व साहित्य त्यांनी पिंजून काढले आहे. दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी या महामानवाला ते रांगोळीच्या माध्यमातून अभिवादन करतात. मात्र पत्नीच्या कर्करोगाच्या आजारामुळे त्यांचा आता जगण्याचा खडतर प्रवास सुरू झाला आहे. तरीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमयी जीवनाची प्रेरणा घेत त्यांच्या विचारांवरच त्यांनी मार्गक्रमण सुरू ठेवले आहे. शरद गायकवाड यांनी 'लोकमत' शी बोलताना आंबेडकरी चळवळीच्या कटू वास्तवाची कहाणी विशद केली.ते म्हणाले, आजही आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता हा उपेक्षितच राहिला आहे.चळवळीचा कार्यकर्ता हा आजही स्वयंप्रकाशित नाही. त्याच्याकडे ना साखरकारखाने, ना कोणता उद्योग आहे. गेल्या 70 वर्षाच्या राजकारणात कार्यकर्त्यांचा विकास झाला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा झेंडा घेतलेला आणि घोषणा देणारा कार्यकर्ता हा स्वकमाईवरच जगत असतो. आंबेडकरी चळवळीचा लाभ हा बहुतांश पुढा-यांना होतो. कार्यकर्ते हे वंचितच राहातात. कार्यकर्त्यांचे दहा बाय दहाचे घर असते आणि तो झोपडपट्टीतील रोजची जगण्याची लढाई लढत असतो. मिळेल ते काम करतो. पण बाबासाहेबांच्या झेंड्याशी प्रामाणिक राहतो. आज माझी बायको कर्करोगग्रस्त आहे. तिच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. मात्र केमोचा खर्च परवडणारा नाही. तरीही कुणाकडे मदतीचे आवाहन केलेले नाही. मित्रमंडळी जमेल तसे मदत करत आहेत. घरात डॉ.आंबेडकर आणि नामदेव ढसाळ यांची संघर्षमयी प्रेरणादायी पुस्तके आहेत. तिचं जगण्याला बळ देतात.         दरवर्षी आंबेडकर जयंतीला लाखो रुपए खर्च करून होणाऱ्या कार्यक्रमांवरही गायकवाड यांनी आक्षेप नोंदविला. हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने होणारे आर्थिक शोषणच आहे. बाबासाहेब यांना अभिप्रेत असलेली जयंती नाचून, गाऊन धिंगाणा घालून साजरी करायची नाहीये. तर शैक्षणिक स्तरावर ती साजरी होणं अपेक्षित आहे. समाजातील नामवंत आणि बुध्दीजीवी मंडळींनी पाच मुलांना जरी दत्तक घेतले असते तरी समाजाची शैक्षणिक प्रगती नक्कीच झाली असती. डॉ. बाबासाहेबांनी ज्या शैक्षणिक संस्था निर्माण केल्या. त्या तालुका किंवा गावपातळीवर पुढे नेण्याची त्यांची जबाबदारी होती. पण त्यांनी केले नाही. आंबेडकरांचे अनुयायी म्हणवणाऱ्यांनी पुस्तके लिहून, गाणी गाऊन बाबासाहेबांच्या नावाने पैसे कमावले. पण त्या पैशांचा समाजाला फायदा करून दिलात का? असा बोचरा सवालही त्यांनी उपस्थित केला.------------------------------------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरartकलाcancerकर्करोग