शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

बालेवाडीसह अंबडवेट गावावर शोककळा; मुळा नदीकाठी वरखडे कुटुंबातील तिघांवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 19:03 IST

केदारी, वरखडे व नागरे या एकाच कुटुंबातील सदस्यांना कोल्हापूर येथे झालेल्या खासगी बस दुर्घटनेत बसचालकासह १३ जणांना जलसमाधी मिळाली. यातील वरखडे कुटुंबातील वडील आणि दोन मुलींवर मुळा नदी किनारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

ठळक मुद्देकुटुंबातील एकाच वेळी तिघांवर अंत्यसंस्कार करताना उपस्थितांचे पाणावले डोळेगौरी इयत्ता दहावीत तर ज्ञानेश्वरी शिकत होती नववीतसंतोष वरखडे हे पिरंगुट येथे एका खासगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून करत होते काम

पौड : २६ जानेवारी व त्याला जोडून आलेल्या शनिवार, रविवार या सुटीच्या निमित्ताने एका खासगी बसने कोकण व कोल्हापूरच्या सहलीसाठी गेलेल्या केदारी, वरखडे व नागरे या एकाच कुटुंबातील सदस्यांना कोल्हापूर येथे झालेल्या खासगी बस दुर्घटनेत बसचालकासह १३ जणांना जलसमाधी मिळाली. यातील वरखडे कुटुंबातील वडील आणि दोन मुलींवर मुळा नदी किनारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.   या दुर्घटनेत बालेवाडी येथील संतोष वरखडे हे आपली पत्नी, दोन मुली तसेच बालेवाडी येथील मेहुणे सचिन केदारी व त्यांचे कुटुंबीय, तसेच नागरे कुटुंबीयातील त्यांची मेहुणी व त्यांची दोन मुले आणि बसचालकासह एकूण १६ जणांना घेऊन शुक्रवारी देवदर्शनाला गेले होते. मात्र, काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने संपूर्ण गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले अंबडवेट येथील संतोष वरखडे व त्यांच्या दोन मुली गौरी आणि ज्ञानेश्वरी यांचे मृतदेह कोल्हापूर येथे शवविच्छेदन करून दुपारी दीडच्या सुमारास अंबडवेट येथे आणण्यात आले. या बाप-लेकींवर मुळा नदीकाठी दुपारी एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबातील एकाच वेळी तिघांवर अंत्यसंस्कार करताना उपस्थितांचे डोळे पाणावले. संतोष वरखडे हे साप्ताहिक श्वासचे संपादक व पत्रकार विजय वरखडे यांचे मोठे बंधू होत.गौरी व ज्ञानेश्वरी या दोघी वारज्यातील आरएमडी शाळेत शिकत होत्या. गौरी इयत्ता दहावीत तर ज्ञानेश्वरी नववीत शिकत होती. अभ्यासात हुशार असणाऱ्या आपल्या मुलींच्या शिक्षणाची उत्तम सोय व्हावी, याकरिता संतोष वरखडे हे पिरंगुट येथे एका खासगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. जाण्या-येण्याच्या सोयीसाठी ते पिरंगुट येथे राहायला गेले होते. या अपघातात संतोष वरखडे यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशीच परिस्थिती बालेवाडी येथील केदारी व नागरे कुटुंबीयांवर कोसळली आहे.

टॅग्स :PaudपौडBalewadiबालेवाडीPuneपुणे