CBI Judge B.H Loya death case: Supreme Court sought Judge Loya's postmortem report from Maharashtra government & said that the matter is very serious | न्या. लोया मृत्यू प्रकरण : ''प्रकरण अत्यंत गंभीर , महाराष्ट्र सरकारने शवविच्छेदन अहवाल द्यावा'' - सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली: सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्याची सुनावणी घेणारे सीबीआयचे न्या. बी.एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणा-या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज, शुक्रवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडे न्या. बी.एच. लोया यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल मागितला आहे. तसंच हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचंही न्यायालयाने म्हटलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.  

नागपूर येथे 1 डिसेंबर 2014 रोजी हृदयक्रिया बंद पडून न्या. लोया यांचा मृत्यू झाला. तशी इस्पितळातील नोंद आहे. ते आदल्या दिवशी एका सहका-याच्या मुलीच्या विवाह समारंभाला उपस्थित होते. त्यांच्या पुढे चालू असलेला खटल्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.

न्या. लोया यांच्या बहिणीने न्या. लोया यांच्या मृत्यूशी संबंधित परिस्थिती आणि सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्याशी असलेल्या संबंधाच्या अनुषंगाने मीडियाकडे संशय व्यक्त केल्याननंतर हे प्रकरण पुढे आले होते. महाराष्ट्रातील पत्रकार बी.आर. लोणे यांची याचिका विचारार्थ घेऊन सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्या. ए.एम. खानविलकर, डी.वाय. चंद्रचूड यांच्या न्यायपीठाने सुनावणी घेण्याचे ठरविले आहे.

हायकोर्टातही याचिका-
मुंबई वकील संघाने ८ जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात न्या. लोया यांचा मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला, याची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. न्या. एस.सी. धर्माधिकारी आणि भारती डांगरे यांचे खंडपीठाने या याचिकेवर 23 जानेवारी रोजी सुनावणी घेण्याचे मान्य केले होते.
 


Web Title: CBI Judge B.H Loya death case: Supreme Court sought Judge Loya's postmortem report from Maharashtra government & said that the matter is very serious
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.