शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
4
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
5
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
6
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
7
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
8
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
9
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
11
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
12
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
13
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
14
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
15
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
19
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
20
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदरच्या शाळा वाऱ्यावर सोडून शिक्षकांची आंबेगाव टूर

By admin | Updated: April 9, 2015 05:09 IST

पुरंदर तालुक्यातील शिक्षक व केंद्रप्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांची आज आंबेगाव तालुक्यात शाळांचे विविध उपक्रम पाहाण्यासाठी टूर गेली आहे.

बाळासाहेब काळे, पुरंदरपुरंदर तालुक्यातील शिक्षक व केंद्रप्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांची आज आंबेगाव तालुक्यात शाळांचे विविध उपक्रम पाहाण्यासाठी टूर गेली आहे. मात्र, टूरमध्ये सहभागी काही शिक्षकांच्या शाळा मात्र बंद होत्या. कोणत्याही प्रकारची माहिती न देता अशा प्रकारचा दौरा म्हणजे गटशिक्षणाधिकाऱ्यांची मनमानीच म्हणावी लागेल, असे पुरंदर पंचायत समितीच्या सभापती गौरी कुंजीर यांनी म्हटले आहे. आज दि. ८ रोजी पहाटे चार वाजता पाच वाहनांतून पुरंदर तालुक्यातील सुमारे ४० शिक्षक, ७ केंद्रप्रमुख, १ विस्तार अधिकारी आंबेगाव तालुक्यात शाळांचा अभ्यास करण्यासाठी व माहिती घेण्यासाठी रवाना झाले. यातील काही शिक्षकांच्या शाळा वाऱ्यावर सोडून देण्यात आल्या होत्या. एकीकडे दुसऱ्या तालुक्यात जाऊन शाळांचा अभ्यास करायचा आणि दुसरीकडे आपण ज्या शाळेत ज्ञानदान करतो, त्या शाळा वाऱ्यावर सोडून द्यायच्या. शैक्षणिक अभ्यास दौरा हाच का, असा प्रश्न पुरंदर तालुक्यातील शिक्षण व राजकीय क्षेत्रातून विचारला जात आहे. विशेष म्हणजे, या अभ्यास दौऱ्याला कोणाचीही परवानगी नसल्याने हा दौरा एक चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान, साकुर्डे येथील दोन शिक्षकी शाळेतील मुख्याध्यापक या दौऱ्यात सहभागी झालेले होते. तर दुसऱ्या सहशिक्षिका शाळेवर गेल्याच नव्हत्या. त्या शाळेत इयत्ता ४ थीपर्यंतचे वर्ग एक स्वयंसेविका सांभाळत होत्या. याबाबत साकुर्डे येथील ग्रामस्थांनी दोन्ही शिक्षक शाळेवर का नाहीत? याबाबत मुख्याध्यापकांशी भ्रमणध्वनीवरून चौकशी केली असता, आपण आंबेगाव येथे अभ्यास दौऱ्यासाठी आलो आहोत, तर सहशिक्षिका आजारी असल्याचे सांगितले. केंद्रप्रमुखांकडे चौकशी केली असता, मला याबाबत या शाळेच्या मुख्याध्यापकांकडून कोणतीच माहिती देण्यात आलेली नसल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, हे दोघेही एकाच वाहनाने दौऱ्यासाठी एकत्रच होते. पुरंदरच्या गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांच्याकडेही याबाबत संपर्क साधला असता, त्यांनीही आपणाकडे याबाबत कसलीच अधिकृत विचारणा अथवा परवानगी घेतलेली नसल्याचे सांगितले. या अनधिकृत दौऱ्याबाबत आपण माहिती घेऊन योग्य ती कारवाई करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. पुरंदरच्या गट शिक्षणाधिकारी ज्योती परिहार मात्र आपण वरिष्ठांची परवानगी घेतल्याचे सांगून दौऱ्याचे समर्थन करीत आहेत.