शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पुणे शहरातील ‘कंजेशन’ रोखण्याकरिता ‘अर्बन रिन्यूवल’चा पर्याय : तज्ज्ञांचे मत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 17:31 IST

कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव शहरातील दाटीवाटीच्या मध्यवस्ती भागात..

ठळक मुद्देशहरातील हे ‘कंजेशन’कमी करण्याची आवश्यकता निर्माण साथींच्या वेळी गावेच्या गावे बाहेर हलविण्यात आल्याची उदाहरणेशहरातील पाच क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सर्वाधिक रुग्ण

पुणे : शहरातील दाटीवाटीचा भाग वाढल्यामुळे नागरी समस्या वाढत चालल्या आहेत. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव याच मध्यवस्तीच्या भागात झालेला आहे. या प्रसाराला दाटीवाटी अधिक सहायक ठरत आहे. त्यामुळे शहरातील हे ‘कंजेशन’कमी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यावर ‘अर्बन रिन्यूवल’ चा पर्याय उपयोगी ठरु शकतो, असे मत नगररचना क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करु लागले आहेत.यापुर्वी प्लेगसह अनेक प्रकारच्या साथी येऊन गेलेल्या आहेत. या साथींच्या वेळी गावेच्या गावे बाहेर हलविण्यात आल्याची उदाहरणे आहेत. नैसर्गिक आपत्ती आणि साथ रोगांच्यावेळी शहरातील दाट वस्तीतील लोकांना बाहेर हलविण्याचा निर्णय घेतला जातो.  शहरातील पाच क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळेले आहेत. या भागातील नागरिकांना शाळांमध्ये हलविण्याची तयारी पालिकेने सुरु केली होती. पालिकेने नागरिकांना शाळांमध्ये जाण्याचे आवाहन केले आहे. परंतू, हा मार्ग तात्पुरता आणि तात्कालीक आहे. यावर कायम स्वरुपी उपाय शोधण्याकरिता १९८२ च्या विकास आराखड्यामध्ये यासाठी ‘अर्बन रिन्यूवल’  अर्थात नागरी पुनर्निमाणाचा पर्यय दिलेला आहे.ज्या प्रभागात अथवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये लोकसंख्येची घनता अधिक असेल अथवा क्षमतेपेक्षा अधिक असेल त्या भागात हा पर्याय वापरुन नव्याने विकसन करण्याची तरतूद आहे. लोकांचे दाटीवाटीने राहणे, त्यामधून निर्माण होणा-या आरोग्य विषयक समस्या, नागरी सुविधांवर येणारा ताण या पयार्यातून कमी करता येऊ शकतो. मुळाच अशा प्रकारे लोकसंख्येची घनता वाढू न देणे ही प्रशासनाची जबाबदारी असते. ज्या भागात पुनर्निमाण करायचे आहे त्यागातील ठराविक परिसर, रस्ते आदी निवडून तेथील कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाते. त्यांच्या नोकरीची ठिकाणे, उत्पन्न, व्यवसाय आदींची माहिती घेऊन त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.त्यानुसार, नागरिकांना शहराच्या अन्य भागात, उपनगरांमध्ये सोयीनुसार हलविणे, त्यांना घरे उपलब्ध करुन देणे हा एक पर्याय आहे. किंवा आहे त्याच ठिकाणी पुनर्निमाण करुन उभारलेल्या इमारतींमध्ये घरे देणे असाही एक पर्याय असतो. अलिकडच्या काळात राबविण्यात येत असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसारख्या योजना 'नागरी पुनर्निर्माण' या प्रकारातच मोडतात. नगररचना कायद्यामध्ये दाटीवाटीच्या भागांचे पुनर्निमाण करण्याकरिता तरतूदी आहेत.=========सध्या कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग असलेला भाग मध्यवस्तीत आहे. दाटीवाटीने नागरिक राहात असले तरी त्यांच्यादृष्टीने या भागात राहणे सर्वाथार्ने फायद्याचे आणि सोईचे आहे. त्यामुळे कितीजण बाहेर राहण्यास जातील असा प्रश्न आहे. त्यांच्यासाठी जागेवरच पुनर्निमाण करणे हा एक पर्याय असू शकतो.=========लोकवस्ती शहराच्या हद्दीबाहेर हलवायची असल्यास त्यासाठी जागा शोधणे, घरे उभारणे आदी कामे करावी लागतील. वास्तविक शहराच्या बाहेर नव्या नगराचा विकास करण्यासाठी पुणे महानगर विकास प्राधिकरणाची स्थापना झाली आहे. जवळपास ८४२ गावे पीएमआरडीएच्या हद्दीमध्ये समाविष्ठ करण्यात आली आहेत. पालिका हद्दीत वाढणारी लोकसंख्या या भागात जावी आणि लोकसंख्येची घनता कमी व्हावी हा त्यामागील हेतू होता. त्याला अधिक चालना देण्याची गरज आहे.============साथीचे आजार, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी गावे अथवा लोकवस्ती हद्दीबाहेर हलविणे हा तात्पुरता उपाय असतो. १९८२ च्या विकास आराखड्यात लोकसंख्येची घनता कमी करण्यासाठी 'अर्बन रिन्युअल'ची कल्पना मांडण्यात आलेली आहे. त्याचा वापर करुन मोठ्या प्रमाणावर ही घनता कमी करता येऊ शकते. तसेच नागरी सुविधांवर येणारा ताणही कमी होऊ शकतो आणि आरोग्य विषयक समस्यांनाही आळा घालता येऊ शकतो. या पयार्याचा विचार होणे गरजेचे आहे.- रामचंद्र गोहाड, नगररचनाकार

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका