शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील तरुणाने तयार केला ‘थर्मल थर्मामिटर’ला पर्याय; 'हेडबँड'ची निर्मिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 18:41 IST

शरीराच्या तापमानावर स्वत: लक्ष ठेवणे होणार शक्य

ठळक मुद्देलहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांना हा हेडबँड वापरता येऊ शकणार

पुणे : सध्या जगभरात कोरोना विषाणूमुळे सार्वजनिक ठिकाणांसह कार्यालये, दुकाने आदी ठिकाणी नागरिकांच्या शरीराचे तापमान ‘थर्मल थर्मामिटर’द्वारे तपासले जाते. परंतू, या थर्मामिटरच्या किंमती आणि त्यामध्ये असलेल्या त्रुटी याचा विचार करुन पुण्यातील तरुणाने ‘मानवी तापमान नियंत्रक हेडबँड’तयार केला आहे. या यंत्रामुळे शारीरिक तापमान मोजणे, ते नियंत्रित ठेवणे आणि त्यावर लक्ष ठेवणे नागरिकांना शक्य होणार आहे.पिंपळे सौदागर येथे राहणाऱ्या चंद्रवदन चांडक यांनी हा हेडबँड तयार केले आहे. चांडक हे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. त्यांनी आठ वर्षे अमेरिकेमध्ये नोकरी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात लॉकडाऊन लागण्याच्या अवघ्या काही दिवस आधी ते भारतात परत आले. जगभरातील कोरोना विषयक माहिती वाचत असताना त्यांना शरीराचे तापमान मोजणारे छोटे यंत्र तयार करण्याची कल्पना सुचली. बऱ्याच देशांनी थर्मल स्क्रिनिंगसाठी रोबोट बनविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यासोबतच सध्या वापरल्या जात असलेल्या थर्मल गनही महागड्या आहेत. या गनद्वारेही नागरिकांच्या शरीराचे तापमान तपासले जाते. सध्या या गनही पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत.चांडक यांनी तयार केलेल्या हेडबँडमध्ये  'टेम्परेचर सेंसर' बसविण्यात आला आहे. तापमान तपासण्याचे तंत्रज्ञान वापरुनच हा हेडबँड तयार करण्यात आला आहे. यामध्ये शरीराचे तापमान एका विशिष्ट मयार्देबाहेर वाढले तर यंत्रामधून अलार्म वाजणार आहे. यासोबतच सूचना देणारे ‘लाईट फंक्शन ’ही देण्यात आले आहे. यामध्ये आवश्यकतेनुसार आणखी बदल आणि सुधारणा करण्यात येणार असल्याचे चांडक यांनी सांगितले. लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांना हा हेडबँड वापरता येऊ शकणार आहे. चांडक यांनी त्यांच्या निर्मितीच्या पेटंटसाठी अर्ज दाखल केला असून पंतप्रधान कार्यालयासह विविध केंद्रिय कार्यालयांना त्यांच्या निर्मितीची माहिती देणारे ई-मेलही केले आहेत.

टॅग्स :Positive on Coronaसकारात्मक कोरोना बातम्याTemperatureतापमानCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य