पाटसला नाभिक समाजासाठी पावणे दोन लाखाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:16 IST2021-05-05T04:16:44+5:302021-05-05T04:16:44+5:30
कोरोनाची वाढती चिंताजनक परिस्थिती आणि कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता शासनाने लॉकडाऊन सुरू केले आहे. याचा मोठा ...

पाटसला नाभिक समाजासाठी पावणे दोन लाखाचे वाटप
कोरोनाची वाढती चिंताजनक परिस्थिती आणि कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता शासनाने लॉकडाऊन सुरू केले आहे. याचा मोठा फटका नाभिक समाजाला बसला आहे. ग्रामीण भागातील छोटे-मोठे सलून व्यवसाय बंद आहेत. गेल्या वर्षापासून नाभिक संघटना सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी सातत्याने करीत आहेत. मात्र, सरकाराकडून अद्याप तरी त्यांच्या मागणीचा विचार केला नाही.
ग्रामीण भागातील अनेक नाभिक समाजाची सलून दुकाने ही भाडे तत्वावर आहेत. त्यांचे भाडे थकले आहे. अशातच दुकाने बंद असल्याने आर्थिक संकटाला जावे लागत आहे. नाभिक समाजाची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना आर्थिक मदत प्रशांत शितोळे यांनी केली आहे.
यावेळी पाटस नाभिक शाखेचे अध्यक्ष सुदाम गवळी, रवींद्र गायकवाड, नाना पवार, नवनाथ सोनवणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.