मोफत आरोग्य कवच विमा वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:14 IST2021-02-27T04:14:42+5:302021-02-27T04:14:42+5:30

चंदननगर: सचिन सातपुते फाउंडेशन याच्यावतीने प्रभाग क्र.४ मधील नागरिकांना मोफत एक लाख रुपयाचे आरोग्य कवच विम्याचे वाटप ...

Allocation of free health cover insurance | मोफत आरोग्य कवच विमा वाटप

मोफत आरोग्य कवच विमा वाटप

चंदननगर: सचिन सातपुते फाउंडेशन याच्यावतीने प्रभाग क्र.४ मधील नागरिकांना मोफत एक लाख रुपयाचे आरोग्य कवच विम्याचे वाटप करण्यात आले.

कोरोनामुळे नागरिक मोठ्या अर्थिक अडचणीत असल्यामुळे सचिन सातपुते यांच्यावतीने उपक्रम राबविण्यात आला. यावेळी परीसरातील ३८६२ नागरिकांनी नावनोंदणी करून नागरिकांना विम्याचे वाटपही करण्यात आले. तसेच मोरया रुग्णालयात विमाधारक उपचार घेत असल्यास त्यांची कुटुंबालाही एक लाखाची सवलत दिली जाणार आहे.

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्याहस्ते वाटप करण्यात आले.

याप्रसंगी जगदीश मुळीक, सुरेश शेजवळ, सचिन सातपुते, आशिष देशमुख, राहुल नानगुडे, संदीप काची, अर्जुन जगताप, शैलेश बनसोडे, अनिल जावळकर, ज्योती जावळकर, सतीश देशपांडे, डॉ. रश्मी वीर, डॉ. ओंकार बापट आदी उपस्थित होते.

-----

फोटो ओळ:-नागरिकांनी मोफत आरोग्य कवच विम्याचे वाटप करताना जगदीश मुळीक, सचिन सातपुते आदी.

Web Title: Allocation of free health cover insurance