पब्लिसिटी स्टंटपायी बिनबुडाचे आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:28 IST2020-12-11T04:28:03+5:302020-12-11T04:28:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : व्यवसायातील वादाच्या अनुषंगाने शाम देशमुख यांनी खोटेनाटे, बिनबुडाचे आरोप केले असल्याचे सेलिब्रिटी शेफ पराग कान्हेरे ...

Allegations of publicity stunts | पब्लिसिटी स्टंटपायी बिनबुडाचे आरोप

पब्लिसिटी स्टंटपायी बिनबुडाचे आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : व्यवसायातील वादाच्या अनुषंगाने शाम देशमुख यांनी खोटेनाटे, बिनबुडाचे आरोप केले असल्याचे सेलिब्रिटी शेफ पराग कान्हेरे यांनी स्पष्ट केले. ‘पब्लिसिटी स्टंट’ म्हणून केलेल्या आरोपांबद्दल देशमुख यांनी माझ्या कुटुंबियांची आणि प्रसारमाध्यमांची माफी मागावी, अशीही मागणी कान्हेरे यांनी केली.

देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन कान्हेरे यांच्यासोबत झालेल्या खासगी व्यवहारांची माहिती दिली होती. या संदर्भात कान्हेरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

कान्हेेरे म्हणाले की, मैत्रीत झालेल्या खासगी व्यवहाराला चुकीच्या पद्धतीने माध्यमांसमोर मांडण्यात आले. माझे आणि शाम देशमुख यांचे व्यावसायिक संबंध आहेत. ‘बिग वडापाव’च्या कोथरुड शाखा फ्रांचाईजीचे ते मालक आहेत. व्यवसायातील वादांमुळे सूडबुद्धीने त्यांनी माझ्या बदनामीचा प्रयत्न केला. व्यवहारातील विलंबामुळे अलंकार पोलिस चौकीत माझ्यासंदर्भात एक अर्ज सादर झाला आहे. ज्याची समक्ष शहनिशा करण्यासाठी पोलिसांनी मला आणि देशमुख दोघांनाही बोलावले होते. त्यावेळी मी हजर झालो पण देशमुख आले नाहीत.

यावरुन त्यांचा उद्देश हा केवळ दिशाभूल करण्याचा होता, असे मला वाटते, असे कान्हेरे म्हणाले. “मी किंवा माझ्या कुटुंबियांकडून खाजगी व्यवहाराबाबत कोणतीच टाळाटाळ करण्यात आलेली नाही. कोरोना संकटाचा सामना करताना सारे जग आर्थिक विवंचनेत आहे. त्याला मीही अपवाद नाही. व्यवहारातली वचनपूर्ती ही व्यवसाय पूर्ववत झाल्यानंतर मी नक्कीच करेन याची वारंवार हमी देऊन देखील देशमुख यांनी सुडबुद्धीने आरोप केले,” असे त्यांनी सांगितले. माझ्या चाहत्यांनी या चुकीच्या आरोपांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Web Title: Allegations of publicity stunts