शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी कोट्यवधींची माया जमवल्याचा आरोप; लाचलुचपत करणार चौकशी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2021 4:22 PM

20 कोटींपेक्षा अधिक मालमत्ता असल्याचा दावा

पुणे : महापालिकेच्या येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त विजय लांडगे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून उघड चौकशी केली जाणार आहे. तब्बल महिन्याभरापासून पडून असलेल्या एसीबीच्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद देत पालिका आयुक्तांनी ही चौकशी करण्यास परवानगी दिली आहे. लांडगे यांची पुणे आणि नाशिकमध्ये कोट्यवधींची मालमत्ता असल्याचा दावा तक्रारदार यांंनी एसीबीकडे केलेल्या तक्रारीमध्ये केला आहे.

एका नगरसेविकेने केलेल्या पालिकेच्या जागेवर अतिक्रमण करीत केलेल्या अनधिकृत बांधकामाची तक्रार सामाजिक कार्यकर्त्या ज्योती राम परिहार यांनी लांडगे यांच्याकडे केली होती. वारंवार याबाबत पाठपुरावा करुनही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. याबाबत, वरिष्ठांनी आदेश दिल्यानंतर क्षेत्रीय कार्यालयाच्या अभियंत्यामार्फत प्रत्यक्ष पाहणी करुन अहवाल दिला होता. हा अहवाल देण्यास लांडगे यांनी नकार दिला.

त्यानंतर, परिहार यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये एसीबीकडे तक्रार अर्ज दाखल केला. या कालावधीत परिहार यांनी लांडगे यांच्या पुण्यातील बाणेर, निगडी, मांजरी, कल्याणीनगर आणि नाशिक येथील मालमत्तांची माहिती मिळविली. तसेच त्यांच्याशी संबंधित विम्याची कागदपत्रे, बँकांचे स्टेटमेंटही मिळविले. ही सर्व कागदपत्रे एसीबीला सादर करण्यात आली. एसीबीने ही कागदपत्रे दाखल करुन घेतली. त्याचा अहवाल तयार करुन एसीबीच्या पोलीस महासंचालक कार्यालयामध्ये पाठविला.

महासंचालक कार्यालयाकडून महापालिका आयुक्तांना लोखंडे यांची उघड चौकशी करण्यास परवानगी देण्याबाबत पत्र पाठविण्यात आले होते. जवळपास एक महिना या पत्रावर प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. याबाबत परिहार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. पालिका आयुक्तांची भेट घेतल्यानंतर या प्रकरणाला गती प्राप्त झाली. पालिकेच्या प्रशासन विभागाकडून आयुक्त कार्यालयाकडे चौकशी करण्याबाबत सकारात्मकता दर्शविण्यात आली.  त्यानंतर आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्यास परवानगी दिली.====20 कोटींपेक्षा अधिक मालमत्ता असल्याचा दावालांडगे यांच्या बाणेर, निगडी, कल्याणीनगर, मांजरीसह नाशिकमध्ये मालमत्ता आहेत. तसेच विमा, बँक आदी कागदपत्रांवरुन ही मालमत्ता 20 कोटींपेक्षा अधिक असल्याचा आमचा दावा आहे. याबाबत एसीबीकडे आम्ही तक्रार केली होती. त्याला प्रशासनाने परवानगी दिली आहे. या प्रकरणाची चौकशी करुन कायदेशीर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.- ज्योती राम परिहार, संस्थापक अध्यक्षा, मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रतिष्ठान====लांडगे यांनी आरोप फेटाळलेलोकप्रतिनिधींमधील वादाची पार्श्वभूमी या तक्रारीला आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. माझ्या अधिकारात नसलेली कारवाई करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात येत होता. याबाबत मी प्रशासनाला आणि वरिष्ठांना लेखी म्हणणे कळविले आहे. याबाबत कायदेशीर मतही मागविण्यात आले होते. मालमत्तेची चौकशी करावी अशा स्वरुपाच्या तक्रारी केवळ मानसिक त्रास देण्यासाठी केल्या जात आहेत.- विजय लांडगे, सहायक आयुक्त, येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालय

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाfraudधोकेबाजीMONEYपैसाAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग