दौंड रेल्वे स्टेशन प्लॅटफार्मवर सर्व रेल्वे गाड्या थांबवाव्यात : सतीश थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:30 IST2020-12-04T04:30:04+5:302020-12-04T04:30:04+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे गेली तीन महिने रेल्वेसेवा बंद असल्याने वेंडर यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दि.१ डिसेंबर पासून पुणे-दिल्ली ...

दौंड रेल्वे स्टेशन प्लॅटफार्मवर सर्व रेल्वे गाड्या थांबवाव्यात : सतीश थोरात
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे गेली तीन महिने रेल्वेसेवा बंद असल्याने वेंडर यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दि.१ डिसेंबर पासून पुणे-दिल्ली रेल्वे सेवा सुरु झाली असून पुण्यावरुन येणारी व दिल्लीवरुन येणारी ट्रेन ही दौंड स्टेशनला न येता दौंड पासून ३ कि.मी.अंतरावरावरील कॉडलाईन प्लॉटफर्मवर या ट्रेन २ मिनिटे थांबणार आहेत. यामुळे दौंड स्टेशनवरील २५० च्या जवळपास वेंडर लोकांना पुन्हा व्यवसाय करणे अवघड होणार आहे. तसेच सर्व वेंडरांचे कुटुंबिय असे सुमारे दोन हजार लोकांना उपासमारीला सामोरे जावे लागणार आहे. तसेच अनेक प्रवासी, व्यापारी दौंड शहर व परिसरातील अनेक नागरिक दररोज दौंड-पूणे अपडाऊन करतात. यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थीनी, महिला आदींना लाईनवरुन दौंड शहरात येण्या-जाण्याचा त्रास होणार आहे. रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन प्रवाशांची लूटमार व छेडछाड या सारख्या अतिप्रसंगाच्या घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी वरील सर्व गोष्टींचा विचार करुन दिल्लीवरून येणाऱ्या दौंडकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या दौंड स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवरच याव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.