शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
5
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
6
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
7
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
8
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
9
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
10
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
11
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
12
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
13
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
14
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
15
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
16
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
17
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
18
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
19
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
20
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल

या व्यक्तीने आतापर्यंत केलेली आंदोलने राज्याच्या नुकसानीची होती; अजित पवारांची राज ठाकरेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 15:04 IST

राज ठाकरेंच्या भोंग्यांच्या भूमिकेनंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे

पुणे : राज ठाकरेंच्या भोंग्यांच्या भूमिकेनंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे. त्यांच्या भूमिकेबाबत विरोध आणि समर्थन दोन्ही गोष्टी होऊ लागल्या आहेत. विरोधी पक्षांकडून या भूमिकेला विरोध होत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज ठाकरेंवर निशाणा साधला जात आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा राज ठाकरेंच्या या भूमिकेवर टीका केली आहे. या व्यक्तीने आतापर्यंत जे जे आंदोलन केलीत ती राज्याच्या, समाजाच्या नुकसानीची होती. असा टोला पवार यांनी लगावला आहे. पुण्यात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीसाठी विभागीय आयुक्त कार्यालय येथे आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

पवार म्हणाले,  ज्यांनी भोंगे या संदर्भात मुद्दा पुढे आणला, पण याच व्यक्तीने टोल बंद करणार म्हणून सांगितलं होतं. पण काही पुढे झालं नाही. या व्यक्तीने आतापर्यंत जे जे आंदोलन केलीत ती राज्याच्या, समाजाच्या नुकसानीची होती. आज टोल घेतला म्हणूनच एवढे मोठे मोठे रस्ते, हायवे झालेत. मागे पण युपी, बिहारवाल्यांना पण हटवा म्हटलं होतं. पण मोठ्या शहरातली बांधकाम बंद पडली होती. हॉकर्स वाल्याना पण त्रास दिला होता पण तेही फेल गेलं. 

हे सगळं चाललंय ते थांबलं पाहिजे

साधं दुधाच्या धारा काढायला बाहेरचे लोक येतात. आपल्याकडे लोक मशीन लावतात. आज सकाळीच पोलिसांसोबत माझी बैठक झाली, नियम काय आहे की सकाळी 6 ते 10 आहे. हे सगळं चाललंय ते थांबलं पाहिजे, सगळ्यांच्याच धार्मिक स्थळांबाबत आपण नतमस्तक होतो. आपल्याकडे आठ आठ दिवस रात्री उशीरा सप्ताह चालतात. बंद करायचं तर सगळंच बंद करावं लागेल. पण आता कोणीही असो तो जर कायदा मोडत असेल तर अजिबात मी ऐकणार नाही. बोलणारे बोलतात, गॅलरीतून इकडे तिकडे बघतात, आणि बाजूला राहतात. आज आपल्यापुढे वेगळे विषय आहेत, कारण नसताना नको ते विषय लोकांच्या मनात घालायचं काम सुरुये. कोणाला भोंगे लावायचे आहेत त्यांनी किती डेसीबील मध्ये चे नियम आहेत ते बघून, परवानगी घेऊन लावावं. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणSocialसामाजिक