शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच राजकीय पक्षांसमोर आता संख्याबळ टिकवण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 10:04 IST

पर्याय उपलब्ध असल्याने सर्वांनाच बंडखोरीचा धोका; महाविकास आघाडीची भिस्त सामूहिक नेतृत्वावर; भाजपने केलेल्या सर्वेक्षणात ४० सदस्य 'डेंजर झोन'मध्ये

- हिरा सरवदेपुणे : महापालिकेच्या २०१७ साली झालेल्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपला पुणेकरांनी भरभरून मते देत स्पष्ट बहुमत दिले. मात्र, सध्याच्या बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपसह सर्वच राजकीय पक्षांसमोर गत निवडणुकीतील संख्याबळ टिकवण्याचे आव्हान असणार आहे. दुसरीकडे इच्छुकांना विविध पर्याय उपलब्ध होणार असल्याने सत्ताधाऱ्यांसह इतरांनाही बंडखोरीचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.मागील तीन ते साडेतीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. त्यामुळे महापालिकांचा कारभार प्रशासनाच्या माध्यमातून कारभार चालविला जात आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्याच्या नगर विकास विभागाने चार सदस्यीय प्रभाग पद्धती निश्चित करून प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर जशी प्रशासकीय पातळीवर निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. तशीच तयारी राजकीय पक्ष आणि इच्छुकांनीही सुरू केली आहे. 

असे असले तरी राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे निवडणुकीची गणिते ही बदलली आहेत. भाजपने शिवसेना फोडून महाविकास आघाडीच्या सत्तेला सुरुंग लावला. त्यानंतर वर्षभराने राष्ट्रवादी काँग्रेसही फोडली. यामुळे राज्याच्या राजकारणात दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस असे पक्ष निर्माण झाले आहे. एक शिवसेना व एक राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सत्ताधारी आहे. तर दुसरी शिवसेना व दुसरी राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेससोबत विरोध पक्ष म्हणून काम करत आहे.

या पार्श्वभूमीवर येऊ घातलेल्या पुणे महापालिका निवडणुकीमध्ये महायुती म्हणून सर्व पक्ष एकत्रित निवडणूक लढवतील, ही शक्यता धूसर आहे. गतनिवडणुकीचा व शहरातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करत भाजप पक्ष अजित पवारांची राष्ट्रवादी सोडून एकनाथ शिंदे यांची शिवसेना, रिपाइं व इतर लहान पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाऊ शकतो. अजित पवार यांच्याकडे असणारी माजी नगरसेवकांची संख्या आणि शहरातील पक्षाची ताकद याचा विचार करता त्यांचा पक्ष स्वतंत्रपणेच निवडणुकीला सामोरे जाऊ शकतो.

तर दुसरीकडे शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस हे तीनही पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता सध्या तरी दिसते. त्यातही दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या संभ्रमामुळे महाविकास आघाडीबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस वगळता इतर दोन पक्षांचा एकही आमदार नाही. शिवाय तीनही पक्षांकडे शहर पातळीवर सक्षम व निर्णय घेऊ शकेल असा एकही मोठा नेता नाही. त्यामुळे महाविकास आघाडीला ही निवडणूक सामूहिक नेतृत्वावर लढवावी लागणार आहे. मागील निवडणुकीत केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागलेल्या मनसेची यापेक्षा वेगळी स्थिती नाही. 

मनसेकडे ही शहर पातळीवर सक्षम नेता नाही. या पक्षाची संपूर्ण भिस्त पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरच आहे. मागील काही निवडणुकांचा अनुभव पाहता राज ठाकरे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काय निर्णय घेतील, हे कोणीच सांगू शकत नाही.

विसर्जित झालेल्या महापालिकेच्या सभागृहात सर्वाधिक (९७) सदस्य संख्या असलेल्या भाजपने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात जवळपास ४० माजी नगरसेवक डेंजर झोनमध्ये असल्याचे समोर आले आहे. तर विरोधीपक्ष म्हणून काम केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची दोन शकले झाली आहे. तर काँग्रेस पक्ष अंतर्गत गटबाजीने पोखरला आहे. याचा विचार करता मागील निवडणुकीत (२०१७) मध्ये पुणेकरांनी जो कौल दिला होता, तो आणि पूर्वीचे सदस्य संख्याबळ टिकवण्याचे आव्हान सर्वांसमोर असेल. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड