शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक की पुण्याचे जावई..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 11:42 IST

सुरुवातीला केवळ माजी नगरसेवकांसाठी ही योजना सुरु करण्यात आली. त्यानंतर यामध्ये माजी नगरसेवकांची पत्नीचा सहभाग करण्यात आला.

ठळक मुद्देआजी-माजी नगरसेवकाच्या कुटुंबाचा दवाखान्याचा बोजा पुणेकरांच्या माथीविकासकामांच्या तिजोरीला लागणार कात्रीसंपूर्ण कुटुंबाला वैद्यकीय सहाय्य योजनेचा लाभ देण्यास मान्यता

पुणे : महापालिकेच्या माजी नगरसेवकांच्या आरोग्यासाठी महापालिकेत अंशदाय वैद्यकीय सहाय्य योजना सुरु करण्यात आली. सुरुवातीला केवळ माजी नगरसेवकांसाठी ही योजना सुरु करण्यात आली. त्यानंतर यामध्ये माजी नगरसेवकांची पत्नीचा सहभाग करण्यात आला. हे ही कमी की काय म्हणून आता माजी नगरसेवक आणि त्याची पत्नी यात त्याची दोन मुले आणि आई-वडिलांचीही भर टाकण्यात आली आहे.  माजी नगरसेवकाच्या संपूर्ण कुटुंबाला वैद्यकीय सहाय्य योजनेचा लाभ देण्यास सोमवारी (दि. १७) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे आजी-माजी नगरसेवकांच्या कुटुंबाच्या वैद्यकीय खर्चाचा बोजा आता करदात्या पुणेकरांच्या माथी मारला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.     नगरसेवक संजय भोसले आणि विशाल धनवडे यांनी दिलेल्या पत्रानुसार, महापालिकेतील सर्व माजी नगरसेवकांच्या आरोग्यासाठी अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना सुरु करण्यात आली. यात सुरुवातीला केवळ माजी नगरसेवक आणि त्याच्या पत्नीचा समावेश केला गेला. यात प्रशसनानेच बदल करत माजी नगरसेवकांची दोन मुले आणि आई-वडिलांचा समावेश करण्याचा ठराव दिला. महापालिकेच्या पॅनेलवरील रुग्णालयांमध्ये ‘सेमी प्र्रायव्हेट वॉर्ड’ची (अंशत: खासगी खोली) सुविधा उपलब्ध करुन देण्याचा ठराव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुर करण्यात आला.स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, उमेश गायकवाड, दिपक पोटे, प्रकाश ढोरे, हेमाली कांबळे, दिलीप वेडे-पाटील (भाजपा), महेंद्र पठारे, अशोक कांबळे (राष्ट्रवादी) यांच्या उपस्थितीत बैठक झाली.---------------- दोन वर्षांत २ कोटी ४२ लाखांचा खर्च माजी नगरसेवक व त्यांच्या पत्नी यांच्या आरोग्यावर गेल्या दोन वर्षांत तब्बल २ कोटी ४२ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. योजना सुरु झाल्यानंतर पहिल्या वर्षी २२७ माजी नगरसेवक व १२५ माजी नगरसेवक पत्नी अशा एकूण ३५२ व्यक्तींवर १ कोटी रुपयांचा खर्च करण्यात झाला. त्यानंतर सन २०१८-१९ मध्ये माजी नगरेसवक व त्यांच्या पत्नी अशा एकूण ३७१ व्यक्तींच्या आरोग्यावर १ कोटी ४२ लाख रुपये खर्च झाले. आता माजी नगरेसवकांचे आई-वडील आणि दोन मुलांचा समावेश झाल्यास हा खर्च काही पटींनी वाढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाHealthआरोग्यMukta Tilakमुक्ता टिळक