शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रुग्णालयांमधील धर्मादायच्या सर्व बेडस् कोविडसाठी ताब्यात घ्याव्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 20:24 IST

पुणे शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ

ठळक मुद्देमहापालिकेने केली धर्मादाय आयुक्तांकडे मागणी 

पुणे : शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत असून पालिकेच्या दवाखान्यांसह खासगी रुग्णालयांमधील खाटाही फुल्ल झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर धर्मादाय आयुक्त कार्यालयाने खासगी रुग्णालयांमधील धर्मादाय म्हणून आरक्षित असलेल्या २५ टक्के बेडस् ताब्यात घेण्याची मागणी महापालिकेने केली आहे. तसे पत्रच महापालिकेने धर्मादाय आयुक्तांना दिले आहे. शहरातील रुग्णसंख्या सहा हजारांच्या जवळपास गेली आहे. यातील तीन हजारांपेक्षा अधिक रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरीही गेले आहेत. परंतु, महापालिकेने स्वाब तपासणीचे प्रमाण वाढविल्याने पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाणही वाढू लागले आहे. विशेषत: कंटेन्मेंट एरियामध्ये हे प्रमाण अधिक आहे. रुग्ण संख्या वाढू लागल्याने पालिकेने शहरातील अनेक खासगी रुग्णालयांसोबत करार करून तेथे कोरोना उपचारांची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. तरीही अनेकदा रुग्णालयात जागा शिल्लक नसल्याचे सांगण्यात येते. काही रुग्णालयांनी धर्मादाय आयुक्तालयाकडे नोंदणी करून त्याच्या रुग्णालयातील २५ टक्के खाटा धमार्दाय म्हणून आरक्षित ठेवण्याचे मान्य केलेले आहे. या रुग्णालयांना त्याचा फायदा सुद्धा मिळतो. या खाटा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी कोरोना रूग्णांवर उपचार करता येतील असे महापालिकेचे म्हणणे आहे. आगामी काळात या खाटांची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे या खाटा ताब्यात घेऊन त्याचा वापर कोरोनासाठी करण्याबाबत पालिकेने धमार्दाय आयुक्तांना पत्र दिले आहे. या पत्रावर अद्याप निर्णय झालेला नसला तरी धमार्दाय आयुक्तांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे अतिरिक्त आयुक्त (ज.) रुबल अगरवाल यांनी सांगितले.

----------- पालिकेने धर्मादाय आयुक्तांना खासगी रुग्णालयातील म्हणून धर्मादाय आरक्षित असलेल्या २५ टक्के खाटा ताब्यात घेऊन त्याचा वापर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचारांसाठी केला जाऊ शकतो असे पत्र दिले आहे. त्याचा रुग्णांना फायदा मिळेल. यावर अद्याप निर्णय झालेला नाही. - रुबल अगरवाल, अतिरिक्त आयुक्त (ज.) पुणे महापालिका 

  

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका