शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या आरोग्यासाठी आळंदी नगरपालिका सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 13:25 IST

आळंदी यात्रेदरम्यान भाविकांसाठीच्या आरोग्यविषयक उपाययोजना तसेच शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगर परिषदेने कंबर कसली आहे. आरोग्य पथके सज्ज करून ती कार्यान्वित केली आहेत.

ठळक मुद्देडेंगीच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेने आरोग्य पथके सज्ज करून ती कार्यान्वित केली आहेत११ नोव्हेंबरपासून कार्तिकी यात्रेला सुरुवात, १४ नोव्हेंबरला एकादशी तर १६ नोव्हेंबरला संजीवन सोहळा

आळंदी : संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री  ज्ञानोबारायांच्या ७२१व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास अर्थात आळंदी यात्रेदरम्यान भाविकांसाठीच्या आरोग्यविषयक उपाययोजना तसेच शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगर परिषदेने कंबर कसली आहे. आरोग्य पथके सज्ज करून ती कार्यान्वित केली आहेत.  सध्या संपूर्ण जिल्ह्यात डेंगीने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांना तसेच यात्रेला आलेल्या भाविकांना याचा फटका बसू नये यासाठी आळंदी नगर परिषदेकडून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. ११ नोव्हेंबरपासून कार्तिकी यात्रेला सुरुवात होणार असून, १४ नोव्हेंबरला एकादशी तर १६ नोव्हेंबरला माऊलींचा संजीवन सोहळा पार पडणार आहे. तत्पूर्वी अलंकापुरीत देवस्थान व नगर परिषदेकडून कार्तिकीची जय्यत तयारी केली जाणार आहे. सोहळ्यापूर्वी आळंदी शहराच्या संपूर्ण परिसरात जेटिंग मशीनद्वारे औषधांची फवारणीचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. शहरातील बंद व खुल्या गटारांमध्ये मशीनच्या मार्फत औषधांची मात्रा फवारण्यात आली आहे. त्यातील जीवजंतू नष्ट करण्यात आले आहेत. तुंबलेली गटारे उपसणे, कचराकुंड्या रिकाम्या करणे, कचर्‍याची विल्हेवाट लावणे, ठिकठिकाणी डिसीन फेक्टो, कार्बोलिक पावडर फवारण्याची कामे सुरु आहेत. शहरातील मुख्य ठिकाणी वाढलेले गवत कामगारांच्या साह्याने काढले जाणार आहे. कार्तिकी सोहळ्याच्या पहिल्या दिवसापासून भाविकांचे आरोग्य रोगमुक्त ठेवण्यासाठी चार टप्प्यांत प्राधान्य देऊन काम केले जाणार आहे.     कार्तिकी सोहळ्याला अलंकापुरीत लाखो भाविकांची उपस्थिती असते. त्यामुळे गर्दी होऊन शहरातील प्रमुख रस्ते मोठ्या स्वरूपात अस्वच्छ होत असतात. अस्वच्छ परिसरामुळे भाविकांना प्रदक्षिणा घालताना तोंडाला रुमाल लावण्याची वेळ येते. भाविकांच्या या समस्यांचा विचार करून परिसर व शहर कचरामुक्त तसेच स्वच्छ ठेवण्यासाठी नगर परिषदेने आता कंबर कसली आहे.

टॅग्स :Healthआरोग्य