शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Alandi Nagar Parishad Election Result 2025: आळंदी नगरपरिषदेवर भाजपची एकहाती सत्ता; नगराध्यक्षपदी प्रशांत कुऱ्हाडे मोठ्या फरकाने विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 15:18 IST

Alandi Nagar Parishad Election Result 2025 शिवसेनेच्या शिंदे गटाला ४, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षपदासह एकूण १५ जागा खेचून आणत विरोधकांचा धुव्वा उडवत ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. नगराध्यक्ष पदाच्या चुरशीच्या लढतीत भाजपचे उमेदवार प्रशांत पोपट कुऱ्हाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे उमेदवार प्रकाश पंढरीनाथ कुऱ्हाडे यांचा तब्बल ६ हजार ६९० मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. प्रशांत कुऱ्हाडे यांना एकूण १२ हजार ७२४ मते मिळाली, तर प्रकाश कुऱ्हाडे यांना ६ हजार ३४ मते मिळाली. या विजयाने आळंदी पालिकेवर भाजपचे कमळ फुलले असून, एकूण १५ जागा जिंकत भाजपने एकहाती सत्ता काबीज केली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाला ४, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि अपक्ष उमेदवारांना या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही.

​प्रभागनिहाय निकालांमध्ये भाजपच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवले आहेत. प्रभाग २ (अ) मध्ये भाजपच्या वैजयंता अशोक उमरगेकर यांनी १८६२ मते मिळवत १५४८ मतांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवला. प्रभाग ५ (ब) मध्ये भाजपच्या खुशी सागर बोरुंदिया यांनी १७०२ मते घेत १२९७ मतांच्या फरकाने बाजी मारली. प्रभाग ८ (अ) मधून भाजपचे सचिन रामदास गिलबिले ९६४ मतांच्या फरकाने, तर प्रभाग ७ (ब) मधून सुनील ज्ञानेश्वर घुंडरे ७२६ मतांच्या फरकाने विजयी झाले. प्रभाग ४ (ब) मध्ये भाजपचे गोविंदा उर्फ सागर कुऱ्हाडे ५५४ मतांनी, तर प्रभाग ५ (अ) मध्ये संतोष मारुती रासकर ५३३ मतांनी निवडून आले. प्रभाग ६ (अ) मध्ये साक्षी अक्षय कुऱ्हाडे (४६६ मते), प्रभाग ९ (अ) मध्ये दिनेश रामदास घुले (४३३ मते) आणि प्रभाग २ (ब) मध्ये रामचंद्र दत्तात्रय भोसले (३४९ मते) यांनी दणदणीत विजय मिळवला.

​याव्यतिरिक्त, प्रभाग १० (ब) मध्ये भाजपच्या ऋतुजा अनिकेत तापकीर २३१ मतांनी, प्रभाग ६ (ब) मध्ये हेमंत गुलाबराव कुऱ्हाडे १६८ मतांनी, प्रभाग ४ (अ) मध्ये कांचन किरण येळवंडे १५४ मतांनी, प्रभाग ३ (अ) मध्ये पूजा संजय घुंडरे ७५ मतांनी आणि प्रभाग ३ (ब) मध्ये सोमनाथ कुंडलिक कुऱ्हाडे ५१ मतांच्या निसटत्या फरकाने विजयी झाले. प्रभाग ८ (ब) मधून भाजपच्या सुजाता कालिदास तापकीर या आधीच बिनविरोध निवडून आल्या आहेत.​             शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनीही काही प्रभागांत वर्चस्व दाखवले. प्रभाग १ (अ) मधून पती- पत्नी निवडून आले आहेत. ऋतुजा आदित्य घुंडरे ६०३ मतांनी, तर प्रभाग १ (ब) मधून आदित्य हनुमंत घुंडरे ५५७ मतांनी विजयी झाले. प्रभाग १० (अ) मध्ये सुरेश खंडेराव झोंबाडे यांनी २५९ मतांनी, तर प्रभाग ७ (अ) मध्ये अरुणा ज्ञानेश्वर घुंडरे यांनी १२० मतांच्या फरकाने विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या वतीने प्रभाग १० (क) मध्ये उज्वला दीपक काळे यांनी ६९९ मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला, तर प्रभाग ९ (ब) मध्ये अर्चना विजय तापकीर यांनी केवळ २५ मतांच्या फरकाने विजय खेचून आणला. दरम्यान प्रशांत कुऱ्हाडे यांच्या रूपाने आळंदीला नवा नगराध्यक्ष मिळाल्याने शहरभर भाजप कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली. 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Dominates Alandi Nagar Parishad Election; Prashant Kurhade Elected President

Web Summary : BJP secured a landslide victory in Alandi Nagar Parishad elections, winning 15 seats. Prashant Kurhade of BJP won the President post by a significant margin. Shivsena Shinde faction won 4 seats and NCP (Ajit Pawar) won 2. Celebrations erupted.
टॅग्स :Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Electionनिवडणूक 2025Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाAlandiआळंदीnagaradhyakshaनगराध्यक्षMahayutiमहायुती