शहरं
Join us  
Trending Stories
1
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
2
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
3
महाडमध्ये शिंदेसेना अन् राष्ट्रवादीत तुफान राडा; वाहनांची तोडफोड, तटकरे-गोगावले संघर्ष पेटला
4
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
5
“नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव, बोगस मतदानावर कठोर कारवाई करा”: सपकाळ
6
हर्षित राणाला गौतम गंभीर इतक्या वेळा संधी का देतो? व्हायरल VIDEO मध्ये सापडलं उत्तर
7
सोन्यापेक्षा चांदीची किंमत दुप्पट! चांदीने दिला ८५% रिटर्न, लवकरच २ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा पार करणार?
8
केंद्राचा मोठा निर्णय; पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलले, ‘सेवा तीर्थ’ नावाने ओळखले जाणार
9
न्यूयॉर्कमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे बालपणीचे घर विक्रीला निघाले;  २०१६ मध्ये ट्रम्प यांना आठवण झालेली...
10
कमाल झाली! चाहता मैदानात घुसला; सामना थांबला आणि हार्दिक पांड्यानं हसत सेल्फीसाठी दिली पोझ
11
स्कूटी घेऊन जाताना कोसळला, २७ वर्षीय विनीतचा हार्ट अटॅकने मृत्यू; धडकी भरवणारा Video
12
पाकिस्तानमध्ये 'एचआयव्ही'चा कहर! १५ वर्षांत रुग्णसंख्या तिपटीने वाढली; लहान मुलांनाही संसर्ग! 
13
भाडे देणे म्हणजे खर्च नाही, तर आर्थिक स्वातंत्र्य! घर खरेदीच्या मोहात पडण्यापूर्वी 'हे' गणित समजून घ्या!
14
Video: विराट - गंभीरमधील वाद ताणला गेला का? एअरपोर्टवर सिलेक्टरशी किंग कोहलीशी गंभीर चर्चा
15
कर्जमुक्त असलेल्या कंपनीच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या, २०% चं अपर सर्किट; ₹३३ वर आली किंमत
16
"प्रत्येक नागरिकाच्या फोनमध्ये प्रवेश कशाला?"; 'संचार साथी' ॲपवरुन प्रियांका गांधींचा केंद्राला थेट सवाल
17
कार बाजारात मोठा उलटफेर; ह्युंदाई चौथ्या क्रमांकवर फेकली गेली, पहिली मारुती, दोन, तीन नंबरला कोण? 
18
१५ डिसेंबरपूर्वी करा 'हे' महत्त्वाचं काम; अन्यथा भरावा लागेल मोठा दंड
19
'संचार साथी' ॲपचे ५ महत्त्वाचे फीचर्स : चोरी झालेले फोन ब्लॉक करा आणि फ्रॉडला आळा घालण्यापर्यंत...
20
अरेरे! "५ लाख वाया गेले, माझी सर्व अब्रू गेली..."; नवरदेवाची व्यथा, नवरीने २० मिनिटांत मोडलं लग्न
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Local Body Election 2025: आळंदी नगरपरिषद निवडणूक; आत्तापर्यंत ४२.८०% मतदारांनी बजावला हक्क, प्रशासनाची चोख तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 15:11 IST

दुपारच्या सत्रात मतदानाचा वेग वाढल्याने, उर्वरित वेळेत अंतिम मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे

आळंदी : तीर्थक्षेत्राचे शहर असलेल्या आळंदी नगरपरिषद नगराध्यक्ष आणि सदस्य पदांसाठी आज (दि. २) शांततापूर्ण आणि उत्साहाच्या वातावरणात मतदान प्रक्रिया सुरु आहे. नगराध्यक्ष आणि २० सदस्य अशा एकूण २१ जागांसाठी ही निवडणूक होत असून, यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. निवडणुकीसाठी एकूण ३० मतदान केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत. आळंदी नगरपरिषदेच्या एकूण २५ हजार ३३१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नोंदणी केली आहे. यामध्ये १३ हजार ५०१ पुरुष, ११ हजार ८२७ महिला आणि ०३ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. नवमतदारांनीही मोठ्या उत्साहाने यात सहभाग घेतला. प्रशासनाच्या चोख नियोजनामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडत आहे.​          सकाळच्या सत्रात मतदारांचा सहभाग काहीसा संथ होता, मात्र दुपारनंतर मतदानाला चांगला वेग मिळाला. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत एकूण ६ हजार २१५ मतदारांनी मतदान केले होते, ही टक्केवारी २४.५४% इतकी होती. यामध्ये २ हजार ६६३ महिला आणि ३ हजार ५५२ पुरुषांचा समावेश होता. तर दुपारी दीड पर्यंत म्हणजेच केवळ दोन तासांत मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान केले. दुपारी दीड वाजेपर्यंत एकूण मतदान १० हजार ८४१ वर पोहोचले. मतदानाची टक्केवारी लक्षणीयरीत्या वाढून ४२.८०% झाली. या वेळेपर्यंत एकूण ४ हजार ९०४ महिला आणि ५ हजार ९३६ पुरुषांनी मतदान केले. तसेच एका तृतीयपंथी मतदारानेही आपला हक्क बजावला.​              दुपारच्या सत्रात मतदानाचा वेग वाढल्याने, उर्वरित वेळेत अंतिम मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने सर्व मतदान केंद्रांवर अत्यंत चोख बंदोबस्त ठेवला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Alandi Nagar Parishad Election: 42.80% Voter Turnout Amidst Tight Security

Web Summary : Alandi Nagar Parishad elections saw 42.80% voter turnout by afternoon. Polling for president and 20 members was peaceful with tight security. Men outnumbered women voters.
टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूक 2024Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदानLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकgram panchayatग्राम पंचायतnagaradhyakshaनगराध्यक्ष