शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

आळंदी : दरोड्याच्या तयारीतील नऊ जणांना पकडले; एका तरुणीचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 14:45 IST

ही कारवाई बुधवारी पहाटे साडेतीन वाजता करण्यात आली...

आळंदी :आळंदीत एका हॉटेलसमोर दरोडा घालण्याच्या तयारीत थांबलेल्या नऊ जणांना आळंदी पोलिसांनी अटक केली. या अटक केलेल्या आरोपींमध्ये एका तरुणीचाही समावेश आहे. सदरची कारवाई बुधवारी (दि.२) पहाटे साडेतीन वाजता करण्यात आली.

सागर मोहन साबळे (वय ३४, रा. साबळेवाडी, ता. खेड), कलीम बादशा शेख (वय २१, रा. माजलगाव, जि. बीड), विलास दत्तात्रय वाघमोडे (वय २४, रा. लक्ष्मीनगर, मोशी), तेजस रवींद्र आल्हाट (वय २१, रा. आल्हाटवाडी, मोशी), योगेश संजय हनुमंते (वय २६, रा. डुडुळगाव, ता. हवेली), वैभव बबन कांबळे (वय २१, रा. भीमनगर, मोशी), रोहित रामदास वाजे (वय २७, रा.सस्तेवाडी, मोशी), विशाल केशवराव जाधव (वय २२, रा. लक्ष्मीनगर, मोशी), काजल दीपक देसाई (वय २४, रा. वडगाव रोड, आळंदी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

आळंदी - चाकण रोडवर बुधवारी रात्री गस्त घालत असताना हॉटेल रमेशच्या समोर आडोशाला काहीजण संशयितरित्या थांबले असल्याचे आळंदी पोलिसांना दिसले. पोलिसांनी कारवाई करून नऊ जणांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक नकली पिस्तुल, सहा मोबाईल फोन, नंबर नसलेली दुचाकी, एक कोयता, लाल मिरची पूड, नायलॉन दोरी असा २ लाख १ हजार १५५ रुपयांचा ऐवज आढळून आला. त्यावरून त्यांच्याकडे चौकशी केली असता ते दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलीस शिपाई कैलास गर्जे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीAlandiआळंदी