शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

खा. सुप्रिया सुळेंवरील निलंबनाच्या कारवाईवर अजित पवारांचं परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 11:44 IST

महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे आणि डॉ. अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे.

पुणे - संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काही युवकांनी केलेल्या घुसखोरीवरुन यंदाचं अधिवेशन चांगलंच गाजलं. या मुद्द्यावरुन संसदेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यावरुनच, विरोधी पक्षांच्या खासदारांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत वेलमध्ये उतरुन गोंधळ घातला. त्यामुळे, लोकसभा अध्यक्षांनी तब्बल १४१ खासदारांचं निलंबन केलं. त्यामध्ये, महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे आणि डॉ. अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी परखडपणे उत्तर दिलं. 

खासदार सुप्रिया सुळे आणि डॉ.अमोल कोल्हे यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (शरद पवार गट) बुधवारी वारजे उड्डाण पुलाखाली आंदोलन करण्यात आले. एकिकडे जनतेचे प्रश्न सभागृहात मांडले म्हणून “महासंसदरत्न” पुरस्कार जाहीर होतो. तर, दुसरीकडे जनतेचे प्रश्न मांडले व सरकारची कोंडी केली म्हणून खासदारांचे निलंबन करून लोकशाहीची हत्या केली जाते, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात आंदोलने केली होती. त्यातच पुण्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीतील नेते अजित पवार पुण्यात आले असता, त्यांना सुप्रिया सुळेंच्या निलंबनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना त्यांनी सुप्रिया सुळेंचं एकट्याचं निलंबन झालं नाही, असे म्हणत भूमिका स्पष्ट केली. 

केवळ सुप्रिया सुळेंचं एकट्याचं निलंबन झालं नाही, अनेक खासदारांचं निलंबन झालंय. संसद सभागृहातील नियमांचा भंग झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. जेव्हा खासदार, लोकसभेत, राज्यसभेत आणि आमदार विधानसभेत कामकाज करत असतात, तेव्हा त्यांच्याकडून सभागृहाच्या कुठल्यातरी नियमाचा भंग झाल्यानेच त्यांच्यावर कारवाई केली जाते. त्यानुसारच, ही निलंबनाची कारवाई झाल्याचं आपण पाहिलंय, असे अजित पवार म्हणाले. तसेच, जवळपास १५० खासदारांच्या निलंबनावर बोलताना, तिथं काय घडलं, हे मला माहिती नाही. विधानसभेत काय घडलं, हा प्रश्न मला विचारल्यास मी सांगितलं, असतं, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे म्हटलं. उपराष्ट्रपती अतिशय व्यवस्थीतपणे आपलं काम पार पाडत असतात, अशावेळी तिथं जे काही घडलं, त्यानुसार खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.  

संसदीय कामकाजमंत्र्यांचं स्पष्टीकरण

सरकार लोकसभेतील सदस्यांना निलंबित करण्यास इच्छुक नव्हती, परंतु  काही विरोधी सदस्यांच्या विरोधात निलंबनाच्या कारवाईनंतर त्यांच्या काही सहकाऱ्यांनी स्वतःलाही निलंबित करण्याची विनंती केली होती,” असा दावा संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शुक्रवारी केला. जोशी यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, संसदेत मंजूर झालेल्या तीन नवीन फौजदारी कायद्यांविरोधात विरोधकांची काही तक्रार असल्यास ते न्यायालयात जाण्यास मोकळे आहेत. “आम्हाला खासदारांना निलंबित करायचे नव्हते, आम्ही त्यांना विनंती केली होती. मात्र आम्ही काही सदस्यांना निलंबित केल्यावर त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी निलंबनाची मागणी सुरू केली. काँग्रेसची पातळी इतकी खालावली आहे,” अशी टीकाही जोशी यांनी केली. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSupriya Suleसुप्रिया सुळे