शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

'जनाई'च्या पाणी प्रश्नाबाबत ३० जानेवारीला बैठक घेऊन मार्ग काढणार- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 12:29 IST

सुपे ( पुणे ) : शासनाच्या जनाई उपसा जलसिंचन योजनेच्या लाभधारक शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे. यासाठी मंत्रालयात ३० जानेवारीला ...

सुपे (पुणे) : शासनाच्या जनाई उपसा जलसिंचन योजनेच्या लाभधारक शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे. यासाठी मंत्रालयात ३० जानेवारीला शेतकरी संघर्ष कृती समितीच्या दहा जणांच्या शिष्टमंडळासह जलसंपदाचे अधिकारी आणि मी स्वत: उपस्थित राहुन बैठकीतून मार्ग काढू, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपोषणस्थळी दिली.

मात्र २६ जानेवारीपासुन सुरु झालेले आमरण उपोषण आंदोलन ३० जानेवारीच्या बैठकिपर्यंत सुरुच ठेऊ. या बैठकीत उपोषण कर्त्यांचे समाधान झाले नाही तर आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे कृती समितीच्यावतीने यावेळी पवार यांना सांगण्यात आले. अजित पवार यांनी संध्याकाळी उपोषणस्थळी भेट देऊन शेतकरी संघर्ष कृती समितीची भेट घेतली. यावेळी त्यांनी १२ मागण्यांपैकी बहुतांश मागण्या पवार यांनी मार्गी लावल्या. तर हक्काचे २.१७ टीएमसी पाणी शेतकऱ्याला मिळावे. तसेच शेतकऱ्यांना हे पाणी तीन आवर्तनात देण्याविषयी चर्चा करण्यात आली. येथे अधिकारी नाहीत त्यामुळे मला त्याबाबत सांगता येणार नाही. आपण अधिकाऱ्यांसह कृती समितीतील १० जणाचे शिष्टमंडळाची बैठक मंत्रालयात घेऊ. येत्या ३० जानेवारीला तुम्ही मुंबईला या असे पवार यांनी सांगितले. टेलला असणाऱ्या शेतकऱ्याला पाणी मिळत नसेल तर तुम्हाला बंद पाईपलाईनमधुन पाणी देऊ, असे पवार यांनी सांगून कालवा सल्लागार समितीवर तीन सदस्य घेतले जातील असे त्यांनी सांगितले.

यावेळी पवार म्हणाले, कऱ्हा नदीवरील बंधाऱ्यांची दुरुस्तीसाठी ९० कोटींची तरतुद केली आहे. पुरंदरसाठी ६० कोटी मंजुर केले आहेत. जनाई चालु करुन ३० वर्ष झाले असून त्यांच्या विद्युत मोटारी, पंपाची दुरुस्तीची आवश्यकता आहे. त्यासाठी ४० कोटीची आवश्यकता असुन येत्या फेब्रुवारीच्या पुरवणी यादीत मंजुर करता येईल असे पवार यांनी सांगितले. सद्या आपण शिंदे सरकारामध्ये असल्याने आणि केंद्रातील मोदी सरकारचा पाठींबा असल्याने आपली विविध विकासकामे मार्गी लागत आहेत.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवार