शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

"जनतेचा ५ महिन्यात कौल बदलला त्याला काय करणार"; बाबा आढावांच्या भेटीनंतर अजितदादांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 15:54 IST

शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी बाबा आढाव यांच्या आंदोलनस्थळाला भेट दिली.

Ajit Pawar : ज्येष्ठ समाजसेवक व लेखक बाबा आढाव हे पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून आत्मक्लेश आंदोलन करत आहेत. विधानसभा निवडणुकीत सरकारी पैशांचा वापर झाला असून ईव्हीएमबाबत संशय घेण्यास जागा असल्याचे बाबा आढाव यांनी म्हटलं आहे. आज सकाळी शरद पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतल्यानंतर अजित पवार हे देखील आंदोलनाच्या स्थळी पोहोचले. यावेळी त्यांनी बाबा आढाव यांच्याशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. "संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्या प्रमाणे बाबा आढाव यांनी आपलं मत मांडले. काही गोष्टी या निवडणूक आयोगाशी तर काही सुप्रीम कोर्टाशी संबधित आहेत. त्यामुळे त्यांना जे योग्य वाटतं त्यानुसार त्यांनी निकाल दिले आहेत. खरंतर वयस्कर लोकांना मतदार केंद्रावर जाऊन त्रास होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने ८५ वर्ष्यांच्या व्यक्तींच्या घरी जाऊन मतदान करण्याची योजना राबवली होती. लवकर अंधार होत असल्याने लाईटची सुविधा मतदान केंद्रांवर करण्यात आली होती," असं अजित पवार यांनी म्हटलं.

"लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ३१ जागा आल्या. आमच्या १७ जागा आल्या. हा जनतेचा कौल असल्याचे आम्ही मान्य केलं. त्यावेळी ईव्हीएमबद्दल कुणी बोललं नाही.बारामतीमध्ये मी जो उमेदवार उभा केला होता तो ४८ हजार मतांनी पराभूत झाला आणि नंतर लगेचच सात महिन्यांनी निवडणुका आल्या. त्या निवडणुकीत मीच ४८ हजारांची भर काढून १ लाखांपेक्षा अधिक मतांनी निवडून आलो. जनतेचा कौल आहे. जनताच म्हणत होती लोकसभेला ताईला आणि विधानसभेला दादाला. त्यामध्ये जनतेने कुणाचं ऐकलं नाही. जनतेचा पाच महिन्यात कौल बदलला त्याला आम्ही काय करणार," असा सवाल अजित पवार यांनी केला.

"१९९९ मध्ये लोकसभा निवडणुकीत लोकांनी वाजपेयींना मतदान केलं आणि विधानसभेला विलासराव देशमुखांना केले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन सरकार स्थापन केलं. मतदार लोकसभेला शरद पवारांना आणि विधानसभेला मला मतदान करत होता. तरीही शरद पवारांना ८५ हजार तर मला ५० हजारांचे मताधिक्य मिळालं. त्यावेळी मी असं म्हटलं नाही की मला २५ हजार मते कमी का पडली. हा लोकांचा कौल होता आणि तो मान्य केला पाहिजे," असंही अजित पवार म्हणाले.

"काही पराभूत उमेदवार मला सांगतात की आमचा पराभव झाला. मी त्यांना सिद्ध करुन दाखवा असं सांगतो. नाना पटोले परवा म्हणाले की संध्याकाळी कसं मतदान वाढलं. साडेचार आणि पाचच्या पुढे लोक रांगेत आले मग त्यांना आतमध्ये घेतलं. माझ्या इथे सकाळी सात ते नऊ पाच टक्के मतदान झालं होतं. त्यानंतर मतदान संपेपर्यंत टक्केवारी १५ टक्क्यांनी वाढली. त्याला आमचा काय दोष आहे. मतदारांनी कधी रांगेत यायचं आणि कधी मतदान करायचं तेच ठरवणार," असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवारBaba Adhavबाबा आढावEVM Machineईव्हीएम मशीन