शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar: 'त्यात आपण समाधान मानलं पाहिजे', अजित पवारांकडून फडणवीसांची पाठराखण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 10:54 IST

Ajit Pawar: लोकांची कामे झटपट झाली पाहिजे. राज्य शासनाने पालकमंत्र्यांची नेमणुक केली हि गोष्ट चांगली आहे

पुणे - राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी नेमणूक केली आहे. या नेमणुकीत काही मंत्र्यांना दोन जिल्ह्याचा तर उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्याकडे ६ जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा पदभार देण्यात आला आहे. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी अगोदर टीका केली होती. आता, फडणवीसांची पाठराखण केल्याचं दिसून येत आहे. यापूर्वी बारामतीमध्ये बोलताना अजित पवारांनी फडणवीसांना ६ जिल्ह्याच्या जबाबदारीवरुन टोला लगावला होता. 

लोकांची कामे झटपट झाली पाहिजे. राज्य शासनाने पालकमंत्र्यांची नेमणुक केली हि गोष्ट चांगली आहे. पण काही मंत्र्यांकडे दोनपेक्षा जास्त जिल्ह्यांची जबाबदारी आहे. पालकमंत्र्यांना जिल्ह्याच्या विकासासाठी वेळ द्यावा लागतो. उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्याकडे ६ जिल्ह्यांची जबाबदारी आहे, मी पुण्याचा पालकमंत्री होतो, तर नाकीनऊ यायचे, त्यांना ते कसं पेलवणार हे माहिती नाही, पण माझ्या शुभेच्छा आहेत, अशा शब्दात विधानसभा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना टोला लगावला होता. मात्र, पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी फडणवीसांची  आणि शिंदे सरकारची पाठराखण केली आहे. 

बऱ्याच जणांना दोन-दोन जिल्हे दिले आहेत, काहींना एकेक दिला आहे. केवळ, उपमुख्यमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीसांकडे ६ जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. आज त्यांच्या सरकारकडे २० मंत्री आहेत, पण, ३६ जिल्ह्यात पालकमंत्री देणे यासंदर्भात विचार करुन त्यांनी हा निर्णय घेतला आहे. हा त्यांचा अधिकार आहे. इतके दिवस आम्ही मागणी करत होतो पालकमंत्री द्या, पालकमंत्री द्या, त्यांनी दिले. त्यामुळे, आता आपण समाधान मानलं पाहिजे, ५ का दिले, सहाच का दिले, अशा विचारांचा मी नाही, असे अजित पवार म्हणाले. तसेच, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, हे पालकमंत्री तेवढा वेळ देऊ शकतील का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. त्यावरही अजित पवारांनी स्पष्टच उत्तर दिले. 

तीन महिने जर कुणीच पालकमंत्री नव्हता, तर त्यांना विश्वास वाटला असेल ते ६ जिल्ह्यांची जबाबदारी घेऊ शकतात. किंवा, त्यांचा तिसऱ्यांदा विस्तारवाढ होईल, तोपर्यंत ती तडजोड असेल, असेही पाटील यांनी म्हटले. अजित पवार यांनी एकप्रकारे देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केल्याचं दिसून आलं. तसेच, पुण्याच्या पालकमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस होतील हे विनाकारणच्या बातम्या आहेत. चंद्रकांत पाटील हेच पुण्याचे पालकमंत्री होतील असे आम्हाला वाटत होते, असेही अजित पवार यांनी म्हटले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसministerमंत्रीPuneपुणे