शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

"कोरोना नियम न पाळल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करणार" अजित पवारांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 17:05 IST

ठरवलेल्या नियमांचे पालन करायला पाहिजेच. तसेच मास्कचाही वापर करावा

ठळक मुद्देदोन्ही शहरातील नागरिकांनी नियम न पाळल्यास कडक पुन्हा कडक निर्बंध लागू

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील निर्बंधात सूट देत अजित पवारांनी दुकानाच्या वेळा वाढवण्याबरोबरच हॉटेल आणि अन्य आस्थापना यांनाही सूट दिली आहे. पण दोन्ही शहरातील नागरिकांनी नियम न पाळल्यास कडक पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात येतील असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे  पुण्यातल्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. ठरवलेल्या नियमांचे पालन करायला पाहिजेच. तसेच मास्कचाही वापर करावा असेही ते म्हणाले आहेत.  

दुकानांच्या बाबतीत बोलताना पवार म्हणाले,  दुकानांचे मालक, सेल्समन यांच्याबद्दल तक्रार येते की मास्क वापरत नाहीत. असं होता कामा नये. कुठलीही चूक होता कामा नये. सहा दिवस 8 पर्यंत दुकानं सुरू राहतील, मालक, सेल्समन यांनी दोन्ही लस घेतलेलेच असले पाहिजे. 

सर्व हॉटेल, रेस्टॉरंट सर्व दिवशी ५० टक्केने सुरू राहतील. जलतरण सोडून सगळे गेम सुरू राहतील. त्याठिकाणी सोशल डिस्टंसीग पाळणे गरजेचे आहे.  मॉल रात्री 8 पर्यंत सुरू राहतील. दोन्ही लसी घेतलेल्यांनाच आत प्रवेश असेल. दर 15 दिवसात स्टाफचं मेडिकल तपासणी होईल. असेही त्यांनी सांगितले आहे.  

शाळांबाबतीत मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मंगळवारी कॅबिनेट मिटिंग मध्ये चर्चा करू.  राज्याच्या धार्मिक स्थळाविषयी जो निर्णय घेतला जाईल तोच पुण्याच्याबाबतीतही लागू असेल. 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकारpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड