शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संजय काकडेंची विश्वासार्हता पुणेकरांना विचारा, मुख्यमंत्र्याबाबतच्या विधानावरुन अजित पवारांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 15:32 IST

Ajit Pawar On Sanjay Kakde: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीत घुसमट होतेय, ते आज ना उद्या नक्कीच आघाडीतून बाहेर पडतील, असं विधान भाजपचे माजी खासदार आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी केलं होतं.

Ajit Pawar On Sanjay Kakde: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीत घुसमट होतेय, ते आज ना उद्या नक्कीच आघाडीतून बाहेर पडतील, असं विधान भाजपचे माजी खासदार आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी केलं होतं. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काकडे यांना जोरदार टोला लगावला आहे. "मीही आता पुण्यात आहे. संजय काकडे देखील पुण्याचे आहेत. त्यांची विश्वासार्हता तुम्ही पुणेकरांनाच विचारा", असं खोचक टोला अजित पवार यांनी लगावला आहे. (ajit pawar slams sanjay kakade statement over cm uddhav thackeray)

भारतात गरज असताना लस निर्यात का केली, केंद्राचा निर्णय चुकला; अजित पवारांचा घणाघात

अजित पवार यांनी आज पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पुण्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची आणि लसीकरणासंदर्भातील सविस्तर माहिती दिली. यावेळी संजय काकडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानाची माहिती अजित पवार यांना देण्यात आली. त्यावेळी अजित पवार यांनी संजय काकडे यांच्या विधानाला फारसं महत्वं देण्याची गरज नसल्याचं म्हटलं आणि संजय काकडेंची विश्वासार्हता पुणेकरांनाच विचारा, असा टोला हाणला. 

पुण्यातील लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडे?राज्य सरकारने पुणे शहरासंदर्भात कोरोना रूग्णांची आकडेवारी सादर केली होती.त्यावर आक्षेप नोंदवत न्यायालयाने पुण्यात कडक लॉकडाऊन लावावा अशा सूचना राज्य सरकारला केल्या होत्या. मात्र यावर राज्य सरकारने पुणे शहराची चुकीची आकडेवारी सादर केली असा आरोप करत पुण्याच्या महापौरांनी केला होता. तसेच आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत या असेही ते म्हणाले होते. आता राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी महापौरांनी तातडीने कोर्टात जावे असे सांगितले. तसेच पुण्याच्या लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील अशी भूमिका जाहीर करत लॉकडाऊनचा चेंडू थेट मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात भिरकावला आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSanjay Kakdeसंजय काकडेUddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्या