'पवारांचा पेट्रोल पंप असला तरीही फोटो मात्र मोदींचाच'- अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 15:02 IST2021-09-25T14:44:00+5:302021-09-25T15:02:19+5:30
बारामती: 'आजवर देशाला उत्तमरीत्या काम करणारे अनेक पंतप्रधान लाभले, परंतु नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून कुणाचाही पेट्रोल पंप असला तरीच इथे ...

'पवारांचा पेट्रोल पंप असला तरीही फोटो मात्र मोदींचाच'- अजित पवार
बारामती: 'आजवर देशाला उत्तमरीत्या काम करणारे अनेक पंतप्रधान लाभले, परंतु नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून कुणाचाही पेट्रोल पंप असला तरीच इथे स्वतःचा फोटो लावायचा हे कंपलसरी केलंय. पेट्रोल भरताना तुम्ही त्यांच्याकडे बघायचंय आणि ते म्हणतात, 'कशी तुझी जिरवली, भर आता शंभरचं', पेट्रोल दरवाढीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावला. अजित पवार (ajit pawar) आज बारामती आणि सातारा दौऱ्यावर आहेत.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, गेली अनेक वर्ष झाले मी राजकारणात आहे. मी पण काम करतो परंतु कुठेही बोर्ड लावत नाही. काय बोर्ड लावायचाय, काम करण्यासाठीच तर तुम्ही मला निवडून दिले आहे. निवडून दिल्यानंतर आम्ही काम केलंच पाहिजे.
'ग्रामीण भागात कधी भाजप निवडून येत नव्हता. परंतु त्यांच्या ( नरेंद्र मोदींच्या) नावावर ग्रामीण भागातही मोठ्या संख्येने लोक निवडून आलेले आपण पाहिले आहेत. लोकशाहीमध्ये जनता त्यांना जे पाहिजे त्यांना निवडून देत असते.' असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.