बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे आज सकाळी एका भीषण विमान अपघातात अकाली निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. बारामती विमानतळाजवळ त्यांच्या खासगी विमानाचा सकाळी सुमारे पावणे नऊच्या सुमारास अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.अजितदादा, असे अचानक निघून जाणे बरोबर नाही..!अपघात इतका भीषण होता की विमानाला तात्काळ आग लागून संपूर्ण विमान जळून खाक झाले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. अपघाताची माहिती मिळताच प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, बारामती येथील रुग्णालयाबाहेर कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी गर्दी जमली असून वातावरण भावनिक झाले आहे. आपल्या नेत्याच्या आठवणींनी अनेक कार्यकर्त्यांचा आक्रोश पाहायला मिळत आहे.
Web Summary : Deputy Chief Minister Ajit Pawar reportedly died in a plane crash near Baramati airport. The private plane crashed around 8:45 AM, killing all five on board. Identification was made via Pawar's wristwatch. Supporters gathered, expressing grief.
Web Summary : उपमुख्यमंत्री अजित पवार का बारामती हवाई अड्डे के पास एक विमान दुर्घटना में निधन हो गया। सुबह करीब 8:45 बजे निजी विमान दुर्घटनाग्रस्त हो गया, जिसमें सवार सभी पांच लोगों की मौत हो गई। पवार की कलाई घड़ी से पहचान हुई। समर्थक शोक व्यक्त करने के लिए एकत्रित हुए।