पुणे : मुंबईतील दादांच्या मीटिंग्स रात्री लवकरच संपल्या होत्या. यामुळे आम्ही दादांना आपण रात्रीच कारने बारामतीला जाऊ असे म्हणालो; पण दादांच्या पुढे कोण जाणार? दादा मला म्हणाले, तू पुण्याला ये, मी सभा आटोपून पुण्यात येतो; मात्र बुधवारी सकाळीच ही दुर्दैवी घटना घडली. आता माझं आयुष्यच थांबलं आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चालक श्यामराव नारायण मनवे (वय ७१) यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.सकाळी मुंबईतून बारामतीला जात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बुधवारी सकाळी ८:५० च्या सुमारास अपघात झाला. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील पाच जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त धडकले आणि अवघा महाराष्ट्र हळहळला. या अपघातानंतर पवार कुटुंबीयांसह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी बारामतीमध्ये धाव घेतली. यावेळी अजितदादांचे चालक श्यामराव नारायण मनवे यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. अजितदादा, असे अचानक निघून जाणे बरोबर नाही..!श्यामराव मनवे म्हणाले की, दि. २० जानेवारी १९९९ पासून मी चालक म्हणून दादांसोबत आहे. दादा माझे दैवत होते. दादा माझ्या घरी गणपतीत जेवायला आले होते. वर्ष २०१३ मध्ये शासनातून निवृत्त झालो. त्यानंतर आजपर्यंत दादांसोबतच काम करत आहे. काल सकाळी ७:३० वाजता दादा मुंबई येथून बंगल्यावरून निघाले आणि थोड्याच वेळात हा दुर्दैवी प्रकार घडला. या घटनेनंतर माझ्या आयुष्यातील सर्वस्व गमावल्याची भावना आहे. हा अपघात अतिशय दुर्दैवी आहे. मुंबईतील बैठका मंगळवारी रात्री लवकर संपल्यानंतर आम्ही दादांना आपण रात्रीच मोटारीतून पुण्याला जाऊ असे सांगितले; पण दादांनी ऐकले नाही. दादांनी आमचे ऐकले असते तर कदाचित ही दुर्दैवी घटना घडलीच नसती, असे म्हणत त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
Web Summary : Ajit Pawar's driver recounts suggesting a night trip to Pune before the fatal plane crash. He expressed deep sorrow, stating his life feels halted after losing Pawar, his revered boss of many years.
Web Summary : अजित पवार के ड्राइवर ने घातक विमान दुर्घटना से पहले पुणे की रात की यात्रा का सुझाव दिया था। उन्होंने गहरा दुख व्यक्त करते हुए कहा कि पवार को खोने के बाद उनका जीवन थम सा गया है, जो कई वर्षों से उनके श्रद्धेय बॉस थे।