शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
2
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
3
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
4
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
5
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
6
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
7
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
8
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
9
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
10
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
11
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
12
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
13
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
14
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
15
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
16
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
17
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
18
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
19
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
20
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई

अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 19:23 IST

अजित पवार यांचा आमदार आम्हाला शिव्या घालतो, पण आज मी बारामतीत आलो आहे, मला रोखून दाखवा असे आव्हान हाके यांनी दिले.

बारामतीअजित पवार कोणत्याही पक्षाची सत्ता आली की, त्या सरकारमध्ये सामील होतात, मात्र सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अजित दादांच्या कारखान्याचा जेवढा टर्नओव्हर आहे. तेवढा आमच्या ओबीसींच्या महामंडळाचा निधीदेखील तेवढा नाही, अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामतीत केली.  शनिवारी (दि. ३१ मे) रात्री हाके यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना अजित पवारांच्या एका कारखान्याची उलाढाल आहे. तेवढाही निधी महामंडळाला मिळत नसल्याची टीका केली. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे. जर राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी १ टक्केच्या वर निधी दिला असेल तर मी माझे आरोप मागे घेतो, असेदेखील हाके यावेळी म्हणाले.            अजित पवार यांचा आमदार आम्हाला शिव्या घालतो, पण आज मी बारामतीत आलो आहे, मला रोखून दाखवा असे आव्हान हाके यांनी दिले. अजित पवार केवळ आर्थिक नियोजन करतात. सामाजिक न्यायाची समता या पोल्ट्री वाल्याला काय कळणार? कायद्याने बंधन असताना ६५० कोटी एससी, एसटी समाजाचा निधी वळवला गेला. महाज्योतीला का पैसे दिले जात नाहीत? सारथीला एवढा निधी कसा दिला जातो? भटक्या विमुक्त महामंडळाला ५० कोटी अपेक्षित होता. पण दिले नाहीत. केवळ सत्तेतून पैसे कमवायचे आणि निवडणूक जिकायची एवढंच यांचे सूत्र आहे.अजित पवारांनी अर्थ खात्यावर नैतिकता दाखवू नये, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असं लक्ष्मण हाके म्हणाले. तुमचे कारखाने बंद पडले तर लगेच निधी मिळतो मग ओबीसींना वेगळा न्याय का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यावेळी अजित पवार सत्तेत असतात. त्यामुळे अजित पवारांचा किंगमेकर शरद पवारच आहेत. गोरगरिबांच्या डोक्यावर जे मिरे वाटतात आम्ही त्यांनाच बोलणार असल्याचे हाके म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारlaxman hakeलक्ष्मण हाकेBaramatiबारामती