शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

Ajit pawar in Pune: अजित पवार कार्यकर्त्यांशी साधत होते संवाद, तेवढ्यात मशिदीतून आला अजानचा आवाज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 12:33 IST

Ajit pawar in Pune: पुणे शहरातील विकासकामांच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार काल पुण्यात आले होते.

पुणे: पुणे महानगरपालिकेची मुदत आज संपणार आहे. तत्पुर्वी पुणे शहरातील विकासकामांच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) काल पुण्यात आले होते. यावेळी नगरसेवकांनी केलेल्या विकासकामांच्या उदघाटनाची लगबग दिवसभर पाहायला मिळाली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात अजित पवारांनी केलेल्या कृतीची सर्वत्र चर्चा सुरू आहे. 

काल खराडी येथील ऑक्सिजन पार्कच्या भूमिजनाला अजित पवार, राज्यमंत्री अदिती तटकरे, आमदार सुनील टिंगरे आदी उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना, जवळच्या मशिदीमधून अजान सुरू झाली. मशिदीतून अजानचा आवाज आल्याने अजित पवारांनी मध्येच आपले भाषण थांबवले. अजान संपल्यानंतर त्यांनी आपले भाषण चालू ठेवले. त्यांच्या या कृतीची सध्या चर्चा होत आहे. 

'कधीही निवडणुका होऊ शकतात'पुणे दौऱ्यात अजित पवारांनी आगामी निवडणुकांबाबत मोठी माहिती दिली. ओबीसी आरक्षणा रद्द झाल्यामुळे निवडणूक लागू नये यासाठी राज्य सरकारने कायद्यान्वये प्रभाग रचनेचे अधिकार आपल्याकडे घेतले आहेत. सध्याची प्रभाग रचना रद्द झाली आहे, आता निवडणूक कमीत कमी 6 महिन्यांसाठी पुढे गेल्याचे सांगितले जात आहे. मात्र निवडणुका सहा महिने पुढे गेल्या असे काही सांगता येत नाही. पुढील काही दिवसात, महिन्यात अचानक निवडणुका जाहिर होऊ शकतात, असे अजित पवार म्हणाले.

'पुन्हा आम्हाला दोष देऊ नका'याशिवाय अजित पवारांनी यावेळी प्रभाग रचनेच्या चर्चांना पूर्णविराम दिला. काही दिवसांपासून राज्यात प्रभाग रचना पुन्हा 2 सदस्यीय होणार असल्याची चर्चा आहे. याबाबत ते म्हणाले, प्रभाग 2 सदस्यीय होणार या चर्चांना काही अर्थ नाही. प्रभाग रचना तीन सदस्यीयच राहणार आहे. निवडणुकीला किती दिवस बाकी आहेत, ते आताच सांगता येणार नाही. पुन्हा मला दोष देऊ नका. नाहीतर आम्हाला फसवलं राव, असं म्हणालं, असेही पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेस