शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

Ajit Pawar : कोणत्या राज्यांना किती ऑक्सिजनचा पुरवठा केला याची माहिती जाहीर करा; अजित पवारांची केंद्र सरकारकडे मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 15:11 IST

ज्या कोणत्या राज्यांमध्ये कोरोना रुग्ण जास्त आढळून येत आहेत, तिथे अधिक क्षमतेने ऑक्सिजनचा पुरवठा करणे  गरजेचे आहे. 

पुणे : राज्य सरकार कोरोना काळात निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या संकटावर मात करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहे. तसेच राज्य सरकार 3 हजार मॅट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करत आहे .मात्र, याचवेळी केंद्र सरकारने कोणत्या राज्यांना किती ऑक्सिजनचा पुरवठा केला याची माहिती जाहीर करावी अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली आहे. 

पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव उपस्थित होते. पवार म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. आम्ही ऑक्सिजनच्या जास्तीत जास्त निर्मितीसाठी प्रयत्नशील आहोत. मात्र, केंद्र सरकारने देखील ज्या कोणत्या राज्यांमध्ये कोरोना रुग्ण जास्त आढळून येत आहेत, तिथे अधिक क्षमतेने ऑक्सिजनचा पुरवठा करणे  गरजेचे आहे. 

तहान लागल्यावर विहीर न खोदता, तिसऱ्या लाटेची तयारी सुरूराज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच अनुशंगानं पुण्यातही तिसऱ्या लाटेसाठीची पूर्वतयारी सुरू करण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. ऑक्सिजनबाबतची राज्याची १२०० मेट्रिक टनची तयारी आता १८०० ने वाढवायची आहे. प्रशासन यंत्रणा रात्रंदिवस काम करते आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे तहान लागल्यावर विहीर न खोदता, तिसऱ्या लाटेची तयारी याआधीच सुरू करण्यात आली आहे, अशीही माहिती पवार यांनी यावेळी दिली. 

१० कोटींपर्यंत लस उत्पादन करण्याचं नियोजन

देशात सर्व नागरिकांसाठी लस गरजेची आहे. लसीकरण झालेल्या ठिकाणी कोरोना आटोक्यात आल्याचंही दिसून आलं आहे. पण लस उत्पादन क्षमता मर्यादित आहे. १० कोटींपर्यंत लस उत्पादन करण्याचं नियोजन आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारcorona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजनCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकार