शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

उदघाटनाला आले आणि म्हणाले, 'या ऑफिसमध्ये फार काळ राहू देणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 18:33 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या झटपट निर्णय घेण्याच्या कार्यपद्धतीची जाणीव सगळ्यांनाच आहे.पण ज्या कार्यालयाचे उदघाटन करण्यासाठी ते आले तेच कार्यालय फार काळ तिथे राहू देणार  नसल्याचे त्यांनी सांगितले.  इतकेच नव्हे तर इतके जास्त भाडे असलेले कार्यालय घेतल्याचा उल्लेखही त्यांनी आपल्या भाषणात वारंवार केला. 

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या झटपट निर्णय घेण्याच्या कार्यपद्धतीची जाणीव सगळ्यांनाच आहे.पण ज्या कार्यालयाचे उदघाटन करण्यासाठी ते आले तेच कार्यालय फार काळ तिथे राहू देणार  नसल्याचे त्यांनी सांगितले.  इतकेच नव्हे तर इतके जास्त भाडे असलेले कार्यालय घेतल्याचा उल्लेखही त्यांनी आपल्या भाषणात वारंवार केला. 

 याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्राच्या कार्यालयाचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरीच्या महापौर उषा ढोरे आदी उपस्थित होते. या कार्यालयाचे उदघाटन दरमहा रुपये १२ लाख इतके भाडे आहे. 

त्याविषयी भाषणात बोलताना पवार म्हणाले की, 'पैसा जनतेचा आहे. १२ लाख महिना प्रमाणे वर्षाला जवळपास दीड कोटी रुपये खर्च होणार आहेत. हे परवडणारे नाही. त्या किमतीत एखादी इमारत उभारता येईल. त्यापेक्षा पुणे-मुंबई स्त्यावर लेबर ऑफिस आहे. इतर काही सरकारी ऑफिस बघून तिथे जागा मिळते का ते बघू असेही ते म्हणाले. 

अधिकाऱ्यांनाही त्यांनी यावेळी सूचक इशारा दिला. ते म्हणाले की, ' अधिकाऱ्यांनी फार नियमावर बोट ठेवू नये. व्यवहारी मार्ग काढावा. एवढं चांगलं कार्यालय असल्यावर दर आठवड्याला आढावा घेणार आहे. किती प्रकल्प आले, किती काम झालं हे बघणार आहे. किरकोळ चूकही माफही करू. मात्र काम झालं नाही तर वेगळा विचार करावा लागेल. राज्यकर्त्यांच्या हातात अनेक गोष्टी आहेत. साईड पोस्टिंग पण आहे अशी तंबीही त्यांनी दिली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण