शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांनी आणली सत्ता खेचून, माळेगाव’ कारखान्यात राष्ट्रवादीचेच वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 10:25 IST

कारखान्याच्या मात्र, पहिल्या गटातील मतमोजणीपासूनच प्रचंड चुरस पाहायला मिळाली.

बारामती :  बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यात  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्ता खेचून आणली आहे. कारखान्याच्या निकाल जाहीर झालेल्या 18 जागांपैकी राष्ट्रवादी पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनलने १3 जागांवर विजय मिळविला. सत्ताधारी सहकार  पॅनलचे ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे आणि विद्यमान अध्यक्ष रंजन तावरे यांच्यासह पाच जणांचा विजय झाला. मात्र कारखान्याची सत्ता टिकवण्यात त्यांना यश आले नाही.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. राज्यात २०१४ मध्ये सत्ताबदल झाल्यावर २०१५ मध्ये ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे  यांनी राष्ट्रवादीच्या पॅनलचा पराभव केला होता. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची रसद त्यांना मिळाली होती. त्यामुळे या वेळी पवार यांनी संपूर्ण ताकद लावली होती. या पराभवाचा वचपा पवार यांनी काढला. पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा तालुक्यातील महत्वाच्या सहकारी संस्थेवर वर्चस्व मिळविण्यात अजित पवार यशस्वी झाले आहे.

कारखान्याच्या मात्र, पहिल्या गटातील मतमोजणीपासूनच प्रचंड चुरस पाहायला मिळाली. माळेगाव गटात राष्टÑवादीचा उमेदवार अवघ्या १४१ मतांनी विजयी झाला.  या गटातून  निळकंठेश्वर पॅनलचे बाळासाहेब तावरे आणि संजय काटे विजयी झाले. सहकार बचाव पॅनलचे रंजन तावरे ६,४११ मते मिळवून विजयी झाले. बाळासाहेब तावरे  यांना ६,१८४,   संजय काटे ५,७४४ मते मिळवून विजयी झाले. सत्ताधारी पॅनलला माळेगांव गटात १७ हजार ३८७ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलला १७ हजार ५३१ मते मिळाली. पणदरे गटात निळकंठेश्वर पॅनलचे योगेश जगताप, केशवराव जगताप आणि तानाजी कोकरे विजयी झाले. ब वर्ग प्रतिनिधी संघातून निळकंठेश्वर पॅनेलचे स्वप्नील शिवाजीराव जगताप यांनी ७७ मते मिळवुन  विजय मिळवत राष्ट्रवादीला खाते उघडून दिले.   सत्ताधारी गटाचे   चतुर्भुज जगन्नाथ  मुळीक  यांना २० मते मिळाली. मतमोजणी केंद्रातील काही जणांच्या उपस्थितीला आक्षेप घेतला गेल्याने मतमोजणी उशिरा सुरू झाली. त्यामुळे अंतिम निवडणूक निकाल हाती येण्यास दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBaramatiबारामतीSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक