शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

उपमुख्यमंत्री अजित पवारांची तुफान फटकेबाजी; द्राक्ष परिषदेत हशा पिकला, म्हणाले..

By विश्वास मोरे | Updated: August 28, 2023 20:50 IST

बंगळुरू पुणे-मुंबई महामार्गवरील वाकड येथे झालेल्या महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमास पवार उपस्थित होते.

पिंपरी : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने वाकड येथील द्राक्ष परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार वाईन कोणाला चढते आणि चढत नाही हे सांगून टाकले. द्राक्ष परिषदेत विनोदी किश्श्ये सांगून हशा पिकविला. ‘‘कोणाला एक वाइन पिली की किक बसते कोणाला खंबा मारला तरी किक बसत नाही, कोणाला पहिल्या धारेची पचते, तर कोणाला अख्खा खंबा ही पचतो, अन् कोणाकोणाला तर एखाद्या घोट पण भारी पडतो. पण, सुदैवाने मी अजून दारूला स्पर्श ही केला नाही, असे गुपित उपमुख्यमंत्र्यांनी उघड केले.

बंगळुरू पुणे-मुंबई महामार्गवरील वाकड येथे झालेल्या महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमास पवार उपस्थित होते. आजच्या भाषणात पवार यांनी अनेक किश्ये सांगितले. मिश्किलपणे टीपन्नी केली. पवार म्हणाले, ‘‘देशी दारूच्या दुकानांना वाईन्स म्हटलं जातं. त्यामुळे काही घटकांचा असा विचार झाला की हे सरकार आणखी वाईन्सची दुकानं टाकताहेत. मुळात ती वाईन्सची दुकानं आणि द्राक्ष पासून निर्मित होणारी वाईन्स यात फरक आहे. हे तुम्ही जाणून आहात. काही देशांत तर पाण्याऐवजी वाईन्स पितात.’’मी अजून स्पर्श ही केलं नाही, हे सुदैव!पवार म्हणाले, ‘‘कोणाला पहिल्या धारेची पचते, तर कोणाला अख्खा खंबा ही पचतो, अन कोणाकोणाला तर एखाद्या घोट पण भारी पडतो. पण, सुदैवाने मी अजून दारूला स्पर्श ही केला नाही.’’

तुम्ही म्हणाल, काय पवार- पवार चाललय!अजित पवार यांनी विवीध कोट्या केल्या. पवार म्हणाले, ‘‘आदरणिय शरद पवार हे नेहमीच तुमच्या मदतीला धावले. ते कृषिमंत्री असल्यापासून शेतकऱ्यांच्या मदतीला येतातच. म्हणूनच काल या परिषदेच्या शुभारंभाला पवार साहेब होते. आज समारोपाला अजित पवार आलेत. आता सगळे म्हणतील काय पवार-पवार चालवलंय. मुळातच तुमच्या द्राक्ष बागायतदार संघाचे चेअरमनचं पवारच आहेत. आता सगळेच पवार म्हटल्यावर पवारांचं चाललंय काय? अशी चर्चा रंगणार आहे.’’ ह्याच्या काकाने असं पाणी दाखवलंपवार म्हणाले, ‘‘ऑगस्टच्या अखेरीस पाऊस पडेल, असं म्हणत होते, कशाचे काय पाऊस आलाच नाही, आता म्हणताहेत सप्टेंबरच्या सुरुवातीला पडेल. आता तर काही महाभाग असे जन्माला आलेत ते सांगतात पाऊस कधी येणार ते. पूर्वी जसं विहीर आणि बोअरचा पानवट्या यायच्या, हातात नारळ घेऊन पुढं चालत चालत पाणी दाखवायचा. ह्याच्या काकाने असं पाणी दाखवलं होतं.’’ यावर हशा पिकला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार