शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत जगतापांचे निकटवर्तीय अजित पवार गटात; राष्ट्रवादीच्या शहर कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख

By निलेश राऊत | Updated: July 7, 2023 17:55 IST

प्रदीप देशमुख यांनी यापूर्वी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली असून शहर प्रवक्ते म्हणून काम केले आहे

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या पुणे शहर कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशमुख यांना नियुक्त पत्र दिले.

प्रदीप देशमुख हे यांनी यापूर्वी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच शहर प्रवक्ते म्हणूनही त्यांनी काम केले आहे. नियुक्तीनंतर देशमुख म्हणाले, अजित पवार यांनी विकासाच्या मुद्द्यावर सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कार्यरत राहू. जनता आणि सरकार यांच्यामधील दुवा म्हणून आपण काम करणार आहोत. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन पुढे जाण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे धोरण आहे. त्याला अनुसरून सर्व घटकांसोबत संवाद ठेवणार असल्याचेही ते म्हणाले.

कोण आहेत प्रदीप देशमुख 

राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे निकटवर्तीय प्रदीप देशमुख होते. प्रशांत जगताप यांच्याकडून पुण्यात राष्ट्रवादीच्या वतीने उपक्रम, आंदोलने, कार्यक्रम घेतले जात असे. त्यावेळी प्रशांत जगताप यांच्याबरोबर देशमुख यांचाही परिपूर्ण सहभाग असायचा. त्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली असून शहर प्रवक्ते म्हणून काम केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष