शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
3
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
4
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
5
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
6
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
7
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
8
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
9
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
10
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
11
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
12
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
13
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
14
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
15
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
16
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
17
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
18
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
19
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
20
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!

अजित दादा माझा आवडीचा नेता, महायुतीतील प्रवेशानंतर शिवतारेंची बदलली भाषा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 16:02 IST

बारामती लोकसभा मतदारसंघात आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघात आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होत आहे.

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीही पुरंदर तालुक्यातील शिवसेना नेते विजय शिवतारेंवर जबरी टीका केली होती. तू यंदा कसा निवडून येतोस ते बघतोच मी, असे म्हणत अजित पवारांनी विधानसभा निवडणुकांपूर्वीच्या भाषणात शिवतारेंना लक्ष्य केलं होतं. विशेष म्हणजे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विजय शिवतारेंचा पराभवही झाला. त्यामुळे, शिवतारे हेही अजित पवारांवर पलटवार करत होते. मात्र, अजित पवार महायुतीत येताच त्यांची भाषा बदलल्याचे दिसून येते. अजित पवार माझा आवडता नेता असल्याचं त्यांनी म्हटलंय.

बारामती लोकसभा मतदारसंघात आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघातील जेजुरी येथे आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाच्या संयोजनाची जबाबदारी शासनाच्यावतीने विजय शिवतारे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यासाठी, ते ठाण मांडून कार्यक्रमस्थळी आहेत. विशेष म्हणजे यंदा प्रथमच ते अजित पवारांचं स्वागत करणार आहेत, त्यांच्यासमवेत स्टेजही शेअर करतील. त्यामुळे, मतदारसंघात चांगलीच चर्चा होतेय. काही महिन्यांपूर्वी अजित पवारांवर टीका करणारे शिवतारे आता अजित पवारांचे गोडवे गाऊ लागले आहेत. अजित पवार माझा आवडता नेता आहे, कर्तबगार नेता आहे, पण चुकीच्या पक्षात आहे, असं मी याअगोदरच बोललो होतो. आता, ते महायुतीमध्ये आल्यामुळे सरकारची ताकद वाढली आहे. आता, २०२४ पर्यंत कोणीही मुख्यमंत्री बनणार नाही, २४ पर्यंत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे, ती संधी कधी मिळेल ते मिळेल. पण, नशिबातही ती संधी असावी लागते, असेही शिवतारेंनी म्हटले. 

दरम्यान, विजय शिवतारेंनी यापूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. त्यावेळी, अजित पवारांनी चांगलाच दम भरला होता. कुणाला मस्ती आली असेल तर ती जिरवण्याची ताकद आपल्यात आहे, अशा शब्दात अजित पवारांनी शिवतारेंना इशारा दिला होता. तर, शिवतारेंनीही अजित पवारांचा राज ठाकरे होणार, ना घर का ना घाट का? असे म्हणत पलटवार केला होता. मात्र, आज शासकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने आज दोघेही एकाच मंचावर दिसणार आहेत. 

टॅग्स :Vijay Shivtareविजय शिवतारेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसJejuriजेजुरी